मुंबई : डोकं दुखणं असो किंवा अगदी साधी अंगदुखी पटकन आठवते ती पेन किलर. अगदी डोक्यापासून ते इतर कोणत्याही दुखण्यावर आपल्याला पटकन बरं वाटायला हवं म्हणून सहज पेन किलरची गोळी घेतली जाते. कधीकधी त्याचं प्रमाण नकळत वाढतं. डॉक्टरांचा सल्ला न घेता घेतलेल्या या गोळ्या बऱ्याचदा धोकादायक ठरू शकतात. या गोळ्या तात्पुरत्या जरी वेदनाशामक असल्या तरी त्यांच्या अति सेवनानं इतर आजारांचा धोका जास्त असतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सतत पेन किलर घेणं म्हणजे इतर आजारांना आमंत्रण देण्यासारखंच आहे. या पेन किलरमध्ये डाइक्लोफेनेक (Diclofenac) नावाचा एक घटक असतो. याच्या अति सेवनामुळे हृदयाच्या ठोक्यांची गती वाढू शकते. त्यामुळे  हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक यांसारख्या मोठ्या आजारांचा धोका उद्भवण्याती शक्यता असते. याशिवाय रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचा धोका वाढू शकतो. 


पेन किलर बद्दल झालेल्या अभ्यासातून एक गोष्ट समोर आली आहे. या अभ्यासातून नागरिकांना इशारा देण्यात आला होता. BMJ मध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात डायक्लोफेनाकच्या वापराची तुलना कोणतेही औषध, पॅरासिटामॉल आणि इतर पारंपारिक वेदनाशामक औषधांसोबत करण्यात आली आहे. जे औषध घेऊन तात्पुरतं बरं वाटतं. 


डेन्मार्कमधील आरहूस युनिव्हर्सिटी हॉस्पिटलच्या संशोधकांनी सांगितले की डायक्लोफेनाक सामान्य विक्रीसाठी उपलब्ध नसावं. जर ते विकलं जात असेल तर त्यापुढे पाकिटावर धोक्याचे तपशील देखील देण्यात यावेत. 


डायक्लोफेनाक औषध म्हणजे काय?
डिक्लोफेनाक हे एक पारंपारिक नॉन-स्टेरॉइडल अँटी-इंफ्लेमेटरी औषध आहे. जे वेदना तात्पुरत्या स्वरुपात थांबवण्यासाठी वापरण्यात येतं. जगभरात याचा वापर खूप मोठ्या प्रमाणात होतो. बरेचदा डॉक्टरांच्या प्रीस्क्रिब्शनशिवाय याचा वापर करणाऱ्यांची संख्या अधिक असावी असं म्हणायला हरकत नाही. 


या संशोधनात इतर NSAID औषधे आणि पॅरासिटामॉल वापरणाऱ्या लोकांमध्ये डायक्लोफेनाक सुरू करणाऱ्या लोकांमध्ये हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीच्या आजारा होण्याचा धोका असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे तुम्ही किंवा तुमच्या घरात डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पेन किलरसारख्या गोळ्या घेत असाल तर सावधान.


Disclaimer : कोणतंही औषध हे परस्पर घेऊन नका, डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या.