शरीराच्या `या` 3 भागांमध्ये होणाऱ्या वेदनांचं कारण असू शकतं वाढलेलं Cholesterol; दुर्लक्ष करू नका!
Pain sign in Cholesterol: शरीरात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढणं हे धोकादायक मानलं जातं. कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर शरीराच्या ठराविक ठिकाणी वेदना जाणवतात. या वेदनांकडे दुर्लक्ष करू नये.
Pain sign in Cholesterol: तुमच्या शरीरातील रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल ( Cholesterol ) जमा होणं, हे फार वाईट मानलं जातं. शरीरात जमा होणारं हे वाईट कोलेस्ट्रॉल ( Bad Cholesterol ) तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक मानलं जातं. ज्यावेळी तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं, त्यावेळी त्याचा परिणाम हा रक्ताभिसरणावर होतो. अशावेळी हृदय विकाराचा झटका ( Heart Attack ) येण्याचीही शक्यता असते.
तुमच्या शरीरात ज्यावेळी कोलेस्ट्रॉलची ( Cholesterol ) पातळी वाढते, त्यावेळी त्याची लक्षणं सहज दिसून येत नाहीत. परंतु जेव्हा कोलेस्ट्रॉल ( Cholesterol ) वाढण्याची लक्षणं दिसून येतात, त्यावेळी त्यावर उपचार केले पाहिजेत. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी आहार ( Diet ) , व्यायाम आणि औषधं ( Medicine ) फायदेशीर ठरतात. मात्र कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर शरीराच्या ठराविक ठिकाणी वेदना होतात.
शरीरात का वाढतं कोलेस्ट्रॉल?
अवेळी जेवण आणि चुकीची जीवनशैली यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात. जीवनशैली योग्य नसेल आणि शारीरिक हालचालींच्या अभाव असेल तर तुमच्या शरीराबरोबरच रक्तवाहिन्यांमध्येही चरबी जमा होऊ लागते. यामुळे हाय कोलेस्ट्रॉल ( High Cholesterol ) वाढतं. जर तुमच्या शरीरात रक्तदाब, मधुमेह, हृदयविकाराचा झटका, कोरोनरी आर्टरी डिसीज अशा समस्यांचा धोका वाढतो. त्यामुळे कोलेस्ट्रॉल ( Cholesterol ) वाढीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये.
शरीराच्या या भागांमध्ये होतात तीव्र वेदना
जर तुमच्या मांड्या, नितंब आणि पायांमध्ये अतिप्रमाणात वेदना दिसून येत असतील, तर याकडे तात्पुरती वेदना म्हणून दुर्लक्ष करू नये. जर या भागांमध्ये तीव्र वेदना होत असतील तर ते हाय कोलेस्ट्रॉलचे ( High Cholesterol ) संकेत मानले जातात. रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल वाढलं की, पेरिफेरल आर्टरी डिसीज होऊन शरीरात रक्तप्रवाह होण्यास अडथळा येतो.
कोलेस्ट्रॉल वाढण्याची इतर दिसून येणारी लक्षणं
याशिवाय कोलेस्ट्रॉलची अजून काही लक्षणंही दिसून येतात. जसं की, पोटात मळमळणं, शरीर सुन्न पडणं, अचानक खूप थकवा जाणवणं, अचानक छातीत वेदना होणं, हात पाय गार पडणं अशा प्रकारची लक्षणंही दिसून येतात. त्यामुळे जर तुम्हाला अशी लक्षणं दिसून येत असतील तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.