मुंबई : कोविडच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेदरम्यान देशभरात चर्चेत असलेली आणि ताप तसंच वेदना कमी करणारे औषध डोलो-650 पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. बुधवारी आयकर विभागाने हे औषध बनवणाऱ्या मायक्रो लॅब्स लिमिटेडच्या आवारात छापा टाकला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयकर अधिकाऱ्यांनी सांगितले की, विभाग या कंपनीच्या बंगळुरू परिसरात झडतीदरम्यान आर्थिक कागदपत्रं, खात्याची पुस्तके आणि व्यवसाय नेटवर्क तपशीलांची छाननी करत आहे. या फार्मा कंपनीवर करचुकवेगिरीचा आरोप आहे.


कंपनीकडून कोणताही प्रतिसाद नाही


अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, कंपनीची ठिकाणं आणि इतर शहरांतील वितरकांच्या परिसराचाही शोध मोहिमेत समावेश करण्यात आला आहे. आयकर विभागाच्या या कारवाईबद्दल मायक्रो लॅब्स लिमिटेडने प्रतिक्रिया दिली नाही. 


दरम्यान फार्मास्युटिकल कंपनीने आपल्या वेबसाइटवर दावा केला आहे की, फार्मास्युटिकल उत्पादनं आणि औषधांच्या निर्मितीमध्ये वापरल्या जाणार्‍या API च्या निर्मिती आणि मार्केटिंगमध्ये गुंतलेली आहे.


कंपनीच्या म्हणण्यानुसार, कंपनीची देशभरात 17 उत्पादन युनिट आहेत आणि परदेशातही व्यवसाय करतात. त्याच्या प्रमुख उत्पादनांमध्ये Dolo-650, Amlong, Lubrex, Diapride, Vildapride, Olmat, Avus, Tripride, Bactoclav, Tenipride-M आणि Arbitel या औषधांचा समावेश आहे.