मुंबई : आपल्यापैकी बरेच असे लोक आहेत, जे आपल्याला बरं नसलं, तरी डॉक्टरकडे न जाता पॅरासिटामॉल खातात आणि आपला दिवस घालवतात. तसे पाहाता पॅरासिटामॉल खाल्यानंतर बऱ्याचदा आपल्याला आराम देखील मिळतो. ज्यामुळे आपण छोट्यामोठ्या सगळ्याच आजारांसाठी पॅरासिटामॉल सरास खातो. ही गोळी अगदी साधी असल्यामुळे विना प्रस्क्रिप्शन देखील आपल्याला ती मेडीकलमध्ये उपल्बध होते. ही गोळी साध्या व्हायरल फीव्हरसाठी खाल्ली जाते. कोव्हिड काळात देखील या गोळीचा मोठ्या प्रमाणात वापर झाला आहे. परंतु तुम्हाला माहिती माहितीय तुम्ही पॅरासिटामॉल खाऊन तुमच्या स्वत:चं खूप मोठं नुकसान करताय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हो तुम्ही बरोबर ऐकलंत आपण जी गोळी आपल्याला बरं वाटावं म्हणून खातोय, ती गोळी आपल्या आरोग्यावर निगेटीव्ह परिणाम करतेय.


खरं तर एका संशोधनातुन असे समोर आले आहे की, पॅरासिटामॉलचा अतिवापर केल्याने व्यक्तीचा जीव धोक्यात येऊ शकतो. त्याच्या रोजच्या वापरामुळे रक्तदाब, हृदयविकाराचा झटका येण्याचा देखील धोका वाढतो.


संशोधनात सहभागी असलेल्या तज्ज्ञांनी सल्ला दिला आहे की, हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका असलेल्या लोकांनी पॅरासिटामॉल घेताना डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.


संशोधनाबाबत जाणून घेऊया


या संशोधनात रुग्णांना दोन आठवडे दिवसातून चार वेळा पॅरासिटामॉलच्या गोळ्या देण्यात आल्या. चार दिवसांनी या रुग्णांची तपासणी केली असता, या रुग्णांचा रक्तदाब लक्षणीय वाढला होता. उच्च रक्तदाबामुळे या रुग्णांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता 20 टक्क्यांनी वाढली होती.


हे संशोधन ब्रिटनमधील लोकांवर करण्यात आले आहे. 10 पैकी एक व्‍यक्‍ती दीर्घकालीन वेदनांसाठी दररोज पॅरासिटामॉल सप्लिमेंट घेते. हे लक्षात घेण्यासारखे आहे की यूकेमधील तीनपैकी जवळजवळ एक प्रौढ व्यक्ती उच्च रक्तदाबाने ग्रस्त आहे.


या रुग्णांनी पॅरासिटामॉल कधीही खाऊ नये


एडिनबर्ग युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर डेव्हिड वेब म्हणाले की, आतापर्यंत पॅरासिटामॉलला सुरक्षित औषध म्हणून पाहिले जात होते. पण या संशोधनानंतर रुग्णांनी पॅरासिटामॉलपासून दूर राहावे. असे डॉक्टर सांगतात.


एनएचएस लोथियन येथील क्लिनिकल फार्माकोलॉजी आणि नेफ्रोलॉजीमधील सल्लागार लीड इन्व्हेस्टिगेटर डॉ इयान मॅकइंटायर म्हणाले, 'डोकेदुखी किंवा तापासाठी पॅरासिटामॉलचा अधूनमधून वापर करणे चांगले आहे. परंतु जे लोक दीर्घकाळापर्यंत किंवा नियमितपणे ती घेत आहेत त्यांच्यासाठी ही गोळी धोक्याची आहे.