भारतीय उपचार पद्धतीने 3 रुग्ण कॅन्सरमुक्त, उपचाराचा 90% खर्चही वाचला; CAR-T म्हणजे नेमकं काय?
CAR-T cell therapy: काही महिन्यांपूर्वी, भारतातील औषध नियामक `सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन` (CDSCO) ने CAR-T सेल थेरपीच्या व्यावसायिक वापरास मान्यता दिलीये. या थेरपी अंतर्गत, रुग्णाची रोगप्रतिकारक शक्ती अनुवांशिकरित्या री-प्रोगाम केली जाते.
CAR-T cell therapy: आयआयटी बॉम्बे आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटल यांच्याद्वार खास थेरेपी विकसीत करण्यात आलेली आहे. 'इम्यूनोएक्ट' असं या थेरेपीचं नाव आहे. ही थेरेपी भारतातील 15 रूग्णांना देण्यात आलेली आहे. इंडियन एक्सप्रेस मध्ये दिलेल्या माहितीनुसार, यापैकी 3 रूग्णांची कॅन्सरपासून मुक्ती झाली आहे. काही महिन्यांपूर्वी, भारतातील औषध नियामक 'सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन' (CDSCO) ने CAR-T सेल थेरपीच्या व्यावसायिक वापरास मान्यता दिलीये. या थेरपी अंतर्गत, रुग्णाची रोगप्रतिकारक शक्ती अनुवांशिकरित्या री-प्रोगाम केली जाते.
कॅन्सरमुक्त घोषित करण्यात आलेले पहिले व्यावसायिक रुग्ण डॉ. गुप्ता यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. कर्नल गुप्ता यांच्यावर टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली. टाटा रूग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्नल गुप्ता आता कॅन्सरपासून मुक्त आहेत. थेरपी घेतल्यानंतर कर्करोगमुक्त झालेला ते पहिले रुग्ण आहेत. वर्षभरापूर्वीपर्यंत कर्नल गुप्ता बरे होण्याचे स्वप्न पाहत होते, पण आता ते कर्करोगमुक्त झाले आहे.
या थेरेपीला किती प्रमाणात खर्च येतो?
दिल्लीस्थित गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. कर्नल व्हीके गुप्ता यांच्यासह अनेक रुग्णांसाठी ही थेरपी जीवनदायी ठरल्याचं समोर आलंय. डॉ.व्ही.के.गुप्ता हे 28 वर्षांपासून भारतीय लष्करात कार्यरत आहेत. 42 लाख रुपये खर्चून त्यांनी ही थेरपी घेतली आहे. परदेशात या थेरेपीची किंमत जवळपास 4 कोटी रूपये इतकी आहे.
भारतात कोण-कोणत्या ठिकाणी दिली जाते ही थेरेपी?
ही नवी थेरेपी NexCAR 19, ImmunoACT थेरेपी आहे. जो IITB, IIT-B रूग्णालयात स्थापित आहे. ही थेरेपी बी-सेल कॅन्सर सारखी ल्यूकेमिका, लिम्फोमा यांसारख्या आजारांवर फोकस करते. CDSCO ने ऑक्टोबर 2023 रोजी याच्या व्यावसायिक वापराला मंजूरी दिली आहे. सध्या ही थेरेपी भारताच्या 10 शहरांमधील 30 रूग्णालयांमध्ये उपलब्ध आहे. 15 वर्षांच्या वरील रूग्ण या थेरेपीचा वापर करू शकतात.
काय आहे CAR-T सेल थेरेपी?
काइमरिक अँटीजेन रिसेप्टर CAR-T सेल थेरपीद्वारे ब्लड कॅन्सरवर उपचार केला जातो. रक्ताच्या कर्करोगाव्यतिरिक्त, लिम्फोसाइटिक ल्युकेमिया आणि बी-सेल लिम्फोमा यांसारख्या गंभीर कर्करोगांवर या थेरपीद्वारे उपचार केले जातात. या थेरपीमध्ये तंत्रज्ञानाच्या मदतीने रुग्णाच्या शरीरातील पांढऱ्या रक्त पेशींच्या टी-सेल्स काढून टाकल्या जातात. यानंतर, टी पेशी आणि पांढऱ्या रक्त पेशी वेगवेगळ्या प्रकारे शरीरात सोडल्या जातात. एकदा का ही थेरेपी पूर्ण झाली की, टी पेशी कॅन्सरशी लढण्याचं काम करतात.