वॉशिंग्टन : कोरोनाची साथ जगभरात सुरु आहे, भारतात केवळ १३ दिवसात १४ लाख लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. जगभरातील वैद्यकीय क्षेत्रातील शास्त्रज्ञ कोरोनाचा बिमोड करण्यासाठी सरसावले आहेत. अमेरिकेचं संरक्षण मुख्यालय पेटागॉनने मधील संरक्षण विभागातील शास्त्रज्ञाना मोठं यश हाती लागलं आहे. येथील शास्त्रज्ञांनी एक मायक्रोचिप बनवली आहे. ही चिप शरीरातील कोरोना विषाणूची लक्षणे ओळखते आणि नंतर थेट फिल्टरद्वारे हा विषाणू रक्तातून बाहेर काढायचं काम करते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकेचे लष्करी मुख्यालय असलेल्या ‘पेंटॅगॉन’मधील संरक्षण विभागाच्या वैज्ञानिकांनी एक मायक्रोचिप विकसित केली आहे.  कोरोनाने मागील वर्षभरापासून जगभर आपली पावलं पसरवली आहेत. या पार्श्वभूमीवर कोरोनाबाबत सातत्याने नवी संशोधने होत आहेत.


हे तंत्रज्ञान सर्व मानवजातील तारणार ठरणार आहे. डिफेन्स अ‍ॅडव्हान्स रिसर्च प्रोजेक्ट एजन्सीने (डीएआरपीए) हे नवे तंत्रज्ञान विकसित केले आहे. संशोधकांच्या पथकाचे प्रमुख डॉ. मॅट हॅपबर्न यांनी दावा केला आहे की ‘कोव्हिड-19’ ही अंतिम साथ असेल.


आता आम्ही भविष्यात कोणत्याही जैविक आणि रासायनिक हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी पूर्णपणे तयार आहोत. ही नवी मायक्रोचिप शरीराच्या कुठल्याही भागात त्वचेच्या खाली लावता येऊ शकते. ती शरीरातील प्रत्येक रासायनिक प्रतिक्रिया दाखवेल. एवढंच नाही तर तुम्ही किती वेळेत संक्रमित होणार हे सुद्धा चिप सांगू शकते.


ही मायक्रोचिपमध्ये राहील आणि ती रक्ताची सतत तपासणी करून अहवाल देईल. तुम्ही कुठेही रक्त चाचणी करू शकाल. तपासणीनंतर तत्काळ ‘रिझल्ट’ मिळत असल्याने वेळ न वाया न घालवता संसर्ग फैलावण्याच्या आधीच विषाणू जिथे आहे, तिथे त्याला नष्ट करता येईल. आम्ही यासाठी डायलिसिसप्रमाणे एक यंत्र विकसित केले आहे. ते रक्तातून विषाणूला पूर्णपणे काढून टाकते. आम्ही ‘पेशंट-16’ या सैनिकावर ही चाचणी घेतली आणि ती यशस्वी ठरली, असेही त्यांनी म्हटले आहे,  डॉ. हेपबर्न यांनी ऊतींसारखा - पेशींचा समूह  पदार्थ दाखवून ही माहिती दिली.