हॉटेलरुममध्ये लोक हमखास करतात या `५` गोष्टी!
आपल्यातील सर्वांनाच काही विचित्र सवयी असतात.
मुंबई : आपल्यातील सर्वांनाच काही विचित्र सवयी असतात. या एकांतात किंवा फ्रेंड्ससमोर बाहेर येतात. तर कधी हॉटेल रुममध्येही. हॉटेल रुममध्ये काही गोष्टी अशा केल्या जातात, ज्या इतरांना सांगितल्या जात नाहीत. पण या करताना फार मज्जा येते. या ५ गोष्टी हॉटेलमध्ये गेल्यावर प्रत्येकजण नक्कीच करतो. तुम्ही पण का?
किटमधील सर्व सामान वापरणे
हॉटेल रुममध्ये एक किट असते. त्यात शॅम्पू, साबण, ब्रश अशा गोष्टी असतात. काही लोक तर इतके आतूर असतात की, हॉटेल स्टाफसमोर ते किट उघडून पाहतात आणि त्यातील सर्व सामान वापरून होईपर्यंत शांत बसत नाहीत.
हॉटेलमधील टॉवेल वापरणे
बाहेर जाताना आपण टॉवेल सोबत घेऊन जातो. पण आपण तो बाहेरही काढत नाही. हॉटेलमधील टॉवेल अनेकजण वापरतात.
रुमधील प्रत्येक गोष्ट न्याहाळणे
हॉटेल रुममध्ये जाताच अनेकजण लगेचच बेडवर पडतात आणि रुममधील प्रत्येक गोष्टीवर नजर टाकतात. मग जवळ जावून सर्व गोष्टी न्याहाळत राहतात.
वॉशरुम स्लीपरचा वापरणे
हॉटेल रुममध्ये अधिकतर लोक असे काम करतात जे घरीही करत नसतील. त्यापैकी एक म्हणजे वॉशरुम स्लीपरचा वापर. हॉटेल रुममध्ये वॉशरुम जाताना त्याचा वापर हमखास केला जातो.
काही सामान सोबत घेऊन जाणे
हॉटेलमधून परतताना काही सामान घेऊन जाणे, ही सवय तर अनेकांना असते. किट, टी बॅग, दूध पावडर अशा गोष्टी हमखास घरी नेल्या जातात.