Health News : पेरू सर्वांना आवडलं जाणार फळं आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार पेरूमध्ये फायबर, प्रोटीन, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स असतात जे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतात. मात्र ज्यांना खाली सांगितलेले आजार आहे त त्यांच्यासाठी पेरू खाणं हानिकारक ठरू शकतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्या लोकांना सर्दी, खोकला आहे त्यांनी पेरू खाऊ नये. कारण पेरू थंड असतो त्यामुळे तुमची अवस्था आणखी बिकट होऊ शकते. विशेषतः रात्रीच्या वेळी पेरू खाणं टाळावं. 


पेरू हे फायबर युक्त फळ आहे, जे पचनास मदत करतं आणि कपच्या समस्यादेखील दूर करतं, पेरू जास्त खाल्ल्यामुळे पचनसंस्थेवरही खूप वाईट परिणाम होतो. ज्या लोकांना आतड्यांसंबंधी त्रास होतो किंवा आहे त्यांनीसुद्धा पेरू खाणं टाळायला हवं. 


पेरू हे कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेलं फळ आहे. ज्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी ते सहसा वापरण्याची शिफारस केली जाते, परंतु पेरू मर्यादित प्रमाणात खाल्ले तरच त्याचा फायदा आहे. पेरू खाल्ल्यावर तुम्ही तुमची ग्लुकोज पातळीही तपासत रहा. कारण पेरूमध्ये नॅच्युलर शुगरही राहते. 


एका दिवसात किती पेरू खावेत?
दिवसातून एक ते दोन मध्यम आकाराचे पेरू खाणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे. ते दोन जेवणाच्या दरम्यान खाणे चांगले. व्यायाम करण्यापूर्वी त्याचे सेवन करणं देखील चांगलं मानलं जातं.  मात्र काहीही करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घेणं महत्वाचं आहे.