हे त्रास असल्यास चुकूनही खावू नका बदाम ; समस्या होतील गंभीर
स्मरणशक्ती तेज होण्यासाठी रोज बदाम खावेत, असे बोलले जाते.
मुंबई : स्मरणशक्ती तेज होण्यासाठी रोज बदाम खावेत, असे बोलले जाते. लहानपणी आई देखील रोज बदाम खाण्यास देत असेल. स्वस्थ राहण्यासाठी रोज बदामाचे सेवन करणे फायदेशीर ठरते. कारण बदामात प्रोटीन, व्हिटॉमिन्स आणि मिनरल्स असतात. आरोग्याबरोबर बदाम खाणे सौंदर्यवर्धकही ठरते. त्वचा आणि केसांसाठी बदाम खाणे उपयुक्त ठरते. परंतु, काही लोकांसाठी बदाम खाणे नुकसानकारक ठरते. पाहुया कोणी बदाम खाणे टाळावे...
# उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्यांनी बदामाचे सेवन टाळावे. कारण रक्तदाबाचा त्रास असणारे लोक नियमित औषधे घेत असतात. अशावेळी बदाम ही समस्या अधिक वाढवेल.
# मुतखडा किंवा किडनी स्टोनची समस्या असल्यास वा पित्ताशयासंबंधित काही त्रास असल्यास बदामाचे सेवन करणे टाळा. कारण त्यात ऑक्सलेटचे प्रमाण अधिक असते.
# पचनासंबंधित काही समस्या असल्यास बदाम खाऊ नका. बदामात फायबर्स अधिक प्रमाण असल्याने समस्या वाढतील. अॅसिडीटीची समस्या असल्यास बदाम खाणे टाळलेलेच बरे.
# बदामात कॅलरीज आणि फॅट्स असल्याने स्थुलतेची समस्या असलेल्यांनी बदाम खावू नयेत.
# आरोग्याच्या कोणत्याही समस्येवर अँटीबायोटीक मेडिसन घेत असल्यास बदाम खाणे बंद करा.