मुंबई : मासिक पाळीला अजूनही समाजात एक टॅबू मानलं जातं. आजही मासिक पाळीसंदर्भात पुरेश्या प्रमाणात जनजागृती झालेली नाही. लोकांच्या मनात अजूनही महिलांच्या या दिवसांबाबत अनेक गैरसमजूती आहेत. तर आजच्या या आर्टिकलमधून लोकांमध्ये असलेल्या गैरसमजूती आणि त्याबाबतची सत्यता जाणून घेणार आहोत. 


गैरसमज- मासिक पाळीदरम्यान महिला केस धुवू शकत नाहीत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मासिक पाळी दरम्यान स्वच्छता राखण्यासाठी महिलांनी दररोज अंघोळ केली पाहिजे. तसंच लोकांच्या मनात एक समज असतो की अशा दिवसांत महिलांनी केस घुतले तर ब्लीडिंग प्रवाह कमी होतो. मात्र असं काही नाही. केस धुतल्याने महिलांच्या ब्लीडिंग फ्लोवर कोणताही परिणाम होत नाही.


गैरसमज- पॅड किंवा टॅम्पोनच्या वापराने ब्लीडिंग कमी होतं


मासिक पाळीदरम्यान पॅड किंवा टॅम्पॉनच्या वापराने ब्लीडिंग फ्लो कमी होतो याबाबत कोणताही पुरावा नाही. त्यामुळे हा एक लोकांच्या मनात असलेला गैरसमज आहे. 


गैरसमज- त्या दिवसांत फिजीकल अॅक्टिव्हीटी करणं टाळलं पाहिजे


गरजेचं नाही की प्रत्येक केसमध्ये असं होईल. काही महिलांना मासिक पाळीच्या दिवसांत अधिक त्रास होतो. त्यामुळे अशा महिलांना आराम केला पाहिजे. असं मानलं जातं की, मासिक पाळीदरम्यान फिजीकल अॅक्टिव्हीटी केल्यास महिलांना आराम मिळतो तसंच रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत मिळते.


गैरसमज- अशा दिवसांत महिलांना झाडांना हात लावू नये


लोकांचा असा गैरसमज आहे की मासिक पाळीदरम्यान महिलांनी झाडांना हात लावला तर झाडं सुकून जातात. मात्र या गोष्टीचाही कोणताही पुरावा नाही.