प्रेग्नेंसी प्लान करताय मग चुकूनही करू नका या गोष्ट, अन्यथा...
गरोदर राहण्यासाठी या गोष्टी ठरतील महत्वाच्या
मुंबई : आजकाल फर्टिलिटी संबंधित समस्या लोकांमध्ये झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे महिलांना गर्भधारणेत अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. बहुतेक तज्ज्ञ चुकीच्या जीवनशैलीमुळे ही समस्या उद्भवते असं कारण देतात. अनेकवेळा जाणूनबुजून किंवा नकळत आपण अशा काही चुका करतो, ज्याची किंमत आपल्याला नंतर मोजावी लागते. त्यामुळे अगोदरच सावध राहणे चांगले, की त्या समस्यांना तोंड देण्याची गरज नाही.
तुमचंही नवं लग्न झालं असेल आणि आता प्रेग्नेंसी प्लॅनिंग करण्याचा विचार करत असाल तर काही सवयी सोडून देणं खूप गरजेचं आहे. जाणून बुजून केलेल्या काही चुका तुम्हाला आई बनण्यात अडचणी निर्माण करू शकतात.
हार्डकोर ट्रेनिंग एक्सरसाइज
तंदुरुस्त राहणे ही चांगली गोष्ट आहे, परंतु त्यासाठी हार्डकोर व्यायाम करण्याची चूक करू नका. हार्ड कोअर ट्रेनिंग एक्सरसाइजचा शरीरातील हार्मोन्सवर चांगला प्रभाव पडतो, ज्यामुळे काही वेळा तुमची मासिक पाळी असंतुलित होते आणि प्रजननक्षमतेशी संबंधित समस्या उद्भवतात. त्याऐवजी, योगा करा आणि तुमच्या खाण्याच्या सवयी सुधारा.
स्मोकिंग आणि अल्कोहोल
जर तुम्हाला धुम्रपान किंवा मद्यपानाची आवड असेल तर तुम्ही या सवयी कायमच्या सोडाव्यात. धूम्रपान आणि अल्कोहोलचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. तसेच गरोदरपणात समस्या निर्माण करतात. त्यामुळे अनेक वेळा महिलांमध्ये रजोनिवृत्तीची लक्षणेही दिसतात. धूम्रपान किंवा मद्यपान हे देखील पुरुषांसाठी चांगले मानले जात नाही. यामुळे पुरुषांच्या शुक्राणूंच्या गुणवत्तेवर परिणाम होतो आणि शुक्राणूंच्या संरचनेवरही परिणाम होतो.
ताण घेण्याची सवय
आजच्या काळात कामाचा ताण इतका वाढला आहे की, इच्छा नसतानाही लोकांना तणावाचा सामना करावा लागतो. पण जर तुम्ही आई बनण्याचे स्वप्न पाहत असाल तर तुम्हाला तणाव घेणे टाळावे लागेल. तणावामुळे केवळ महिलाच नाही तर पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवरही नकारात्मक परिणाम होतो. लक्षात ठेवा की तणाव घेतल्याने तुमची समस्या कधीच सुटत नाही, उलट तुम्ही स्वतःसाठी समस्या वाढवता. त्यामुळे ताण घेण्यापेक्षा त्यावर उपाय विचारात घ्या. जर तुम्हाला उपाय सापडला नाही, तर काही काळासाठी ती समस्या सोडा.
मासे घाणं टाळा
काही माशांमध्ये मर्करीचे प्रमाण जास्त असते. रक्तात मर्करीचे जास्त प्रमाणात असल्याने, प्रजननक्षमतेशी संबंधित समस्या उद्भवतात. म्हणूनच, जर तुम्ही गर्भधारणेसंबंधी विचार करत असाल तर जास्त मासे खाऊ नका. जरी तुम्ही गरोदर असाल तरी जास्त प्रमाणात सेवन टाळा. कारण गर्भाच्या मेंदू आणि मज्जासंस्थेच्या विकासावर परिणाम होतो.