Plastic Tea Strainer Side Effects: चहा म्हटले की लगेच डोळ्यासमोर वाफाळता चहा येतो. अनेक जण चहाचे शौकिन असतात. दिवसातून तीन ते चार वेळा काहीजणांना चहा लागतो. मात्र चहा पिताना आपण एक चूक करतो आणि तीच एक चूक जीवावर बेतू शकते. चहा गाळण्यासाठी गाळणीचा वापर केला जातो. अगदी घरापासून ते बाहेर रस्त्यावरच्या टपरीवरतीही चहाची गाळणी हमखास वापरली जाते. मात्र, गाळणीबाबत केलेला एक निष्काळजीपणामुळं तुमचं आरोग्य धोक्यात येऊ शकते. अनेकदा लोक प्लास्टिकची गाळणी वापरतात. मात्र, प्लास्टिकच्या गाळणीमुळं अनेक आजारांना आमंत्रण मिळू शकते. 


प्लास्टिकच्या गाळणीमुळं अनेक आजारांना आमंत्रण


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वाफाळते पेये किंवा गरम जेवण जेव्हा प्लास्टिकच्या संपर्कात येते तेव्हा ते आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरते, असा दावा जॉ भूमेश त्यागी यांनी केला आहे. फक्त प्लास्टिकची गाळणीच नाही तर प्लास्टिकचे कप, प्लेट, चमचे हेसुद्धा नुकसानदायक ठरु शकतात. अनेकदा प्लास्टिकची गाळणी ही रिसायकल्ड केलेल्या प्लास्टिकपासून तयार केली जाते. त्यातून तुम्ही चहा गाळता. त्यामुळं त्यात असलेले टॉक्सिक केमिकल्स तुमच्या चहा व किटलीत मिसळतात. त्यामुळं तुम्हाला गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो. 


प्लास्टिकच्या गाळणीचा सातत्याने वापर केल्यास मायक्रोप्लास्टिकचा निर्माण होतात. इतकंच नव्हे तर, ऑफिसमध्ये अशताना चहा पार्सल मागवल्यावर तो प्लास्टिकच्या पिशवीत देण्यात येतो. ही पद्धतही तुमच्या आरोग्यासाठी नुकसानदायक ठरु शकते. 


प्लास्टिकच्या गाळणीमुळं होणारे नुकसान 


कॅन्सरचा धोका


प्लास्टिकमध्ये मेट्रोसेमिन आणि बिस्फीनॉलसारखे हानिकारक केमिकल्स आढळले जातात. जे आपल्या शरीरात कॅन्सर पसरवण्याचे काम करतात. त्यामुळं तुमच्या जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो. 


गरोदर महिलांसाठी नुकसानदायक
गरोदर असलेल्या महिलांनी चुकूनही प्लास्टिकच्या कपातून किंवा प्लास्टिकच्या गाळणीतून चहा पिऊ नये. कारण अशावेळी त्यांच्या गर्भातील मुलापर्यंत मायक्रोप्लास्टिक पोहोचू शकतात. ते त्याच्यासाठी नुकसानदायक ठरु शकते. 


किडनीवर परिणाम 


अनेक संशोधनात असा दावा केला जात आहे की,  प्लास्टिकमुळं किडनीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. किडनीच्या फिल्टरिंग प्रोसेसवर परिणाम होतो. 


पुरुषांमध्ये नपुंसकता 


प्लास्टिकच्या गाळणीचा वापर करण्याची सवय असल्यास ती आत्ताच बदला कारण त्यामुळं पुरुषांमध्ये नपुंसकत्व येऊ शकते. 


पचनसंस्था मंदावते


प्लास्टिकच्या गाळणीतून निघणारे मायक्रोप्लास्टिक आपल्या आतड्यांचे आरोग्यावर परिणाम करते. त्यामुळं आपली पाचनसंस्था बिघडू शकते. 


मेंदूवर परिणाम


प्लास्टिकमध्ये असलेले खतरनाक केमिकल्स तुमच्या मेंदूला नुकसान पोहोचवू शकतात. त्यामुळं तुमची स्मरणशक्ती आणि एकाग्रतावर प्रभाव पडू शकतो.


प्लास्टिकची गाळणी वापरणे लगेचच बंद करा


घरात चहासाठी प्लास्टिकची गाळणी वापरत असाल तर लगेचच ही सवय बदला. त्याऐवजी स्टीलची गाळणी वापरा. काही जण सूती कपड्यापासून तयार करण्यात आलेली गाळणी वापरतात. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)