मुंबई : रेडिओवर 'मन की बात' या कार्यक्रमाचे दर रविवारी खास प्रक्षेपण होते. देशवासियांशी गप्पा मारताना या कार्यक्रमात नरेंद्र मोदी नियमित काही महत्त्वाच्या घटनांचा उल्लेख करतात, त्याबाबत सल्ले देतात. आज नरेंद्र मोदींनी फीटनेसचं रहस्य उलगडताना शरीराचे स्वास्थ्य जपण्यासाठी 'योगाभ्यास' करणं हा सहजसोपा आणि मोफत पर्याय असल्याचं म्हटलं आहे. 


अक्षय कुमारचं कौतुक  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजच्या 'मन की बात'मध्ये नरेंद्र मोदींनी अक्षय कुमारचं कौतुक केलं. अक्षय कुमार देशातील तरूणांना फीटनेक फ्रीक बनवण्यासाठी प्रेरणा देत असल्याचं म्हटलं आहे. 


फिट इंडीयाचं प्रमोशन 


मागील काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार 'फिट इंडिया' प्रमोट करत आहे. त्याच्याशी संबंधित काही व्हिडिओजदेखील तो ट्विटरच्या माध्यमातून शेअर करतो. 
अक्षय नियमित वेगवेगळे फीटनेसचे फंडे त्याच्या चाहत्यांसोबत शेअर करतो. या माध्यमातून तो भारताला फीट बनवण्यासाठी प्रेरणा देत आहे. 


 



 



 



पॅडमॅनच्या दरम्यानही भेट 


काही महिन्यांपूर्वी अक्षयकुमारचा 'पॅडमॅन' हा चित्रपट रिलिज झाला होता. या चित्रपटामध्ये अक्षय प्रमुख भूमिकेत होता. या चित्रपटाच्या माध्यमातून त्याने मासिकपाळीच्या दिवसातील स्वच्छतेबाबत खास संदेश दिला आहे. 'पॅडमॅन' चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान अक्षय कुमारने नरेंद्र मोदींची भेट घेतली होती.