High Cholesterol: शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. अन्यथा भविष्यात त्रास होऊ शकतो. ही परिस्थिती टाळण्यासाठी प्रथम आपला आहार बदलणं गरजेचं आहे. कारण काही लोक खराब अन्न खातात, त्यामुळे शरीरात खराब कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते.  अनेकांना हा प्रश्न पडला असेल की, खराब कोलेस्ट्रॉल वाढण्याचे मुख्य कारण काय आहे. चला जाणून घेऊया.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खराब कोलेस्ट्रॉल वाढण्याची ही मुख्य कारणे आहेत


  • खाण्याच्या सवयी


सर्वप्रथम तुम्हाला आहारावर नियंत्रण मिळवावं लागेल. कारण तुम्ही ज्या प्रकारचा आहार घेत आहात त्याचा शरीरावर कोणता परिणाम होते, याची माहिती असणं आवश्यक आहे. जर तुम्ही भरपूर चरबीयुक्त पदार्थ खाल्ले तर शरीरात खराब कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत या गोष्टींपासून दूर राहिल्यास बरे होईल. तुमच्या आहारात अधिकाधिक हिरव्या भाज्यांचा समावेश करा. त्याचा तुम्हाला फायदा होईल.


  • लठ्ठपणा


तुम्हाला माहिती आहे का की तुमचे वजन वाढल्यावर शरीरात खराब कोलेस्ट्रॉल वाढण्याचीही शक्यता असते. यासाठी वजन नियंत्रणात असणं गरजेचं आहे. यासाठी तुम्ही व्यायाम, योगा करणं आवश्यक आहे.


  • दारू आणि धूम्रपान


तुम्ही दारू आणि धूम्रपान करत असाल तर तुम्ही तुमच्या आरोग्याशी खेळत आहात. कारण या दोन्ही गोष्टी आरोग्यासाठी चांगल्या नाहीत हे सर्वांनाच माहीत आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला या दोन्ही गोष्टी टाळाव्या लागतील. अन्यथा शरीरात खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढू शकते.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. कृपया ती अवलंबण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)