मुंबई : कोरोना आला काय आणि त्यानं थैमान घालण्यास सुरुवात केली काय. आरोग्यासोबत जगण्यावरच हल्ला करणाऱ्या या विषाणूनं सर्वांनाच सळोकीपळो करुन सोडलं. अनेकांना या विषाणूची लागण झाली. बरेचजण या संसर्गातून सावरलेही. पण, यानंतरही त्यांच्या प्रकृतीबाबत असणाऱ्या तक्रारी मात्र काही केल्या थांबल्या किंवा संपल्या नाहीत. (Corona omicron )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मागच्या काही दिवसांपासून ओमायक्रॉननं नवी दहशत पसरवलीय दरम्यानच्या काळात हवमानातील बदल आणि प्रदूषण, धुरके युक्त हवा यामुळं अनेकांनाच कोरड्या खोकल्याचा त्रास उदभवला.


कोरोनानंतरही खोकला टीकून राहणाऱ्यांचीही हीच तक्रार होती. सगळं करुन पाहिलं, पण हा खोकला काही जाईना हीच तक्रार अनेकांनी केली. 


पण, तुम्ही खाली देण्यात आलेले उपाय करुन पाहाल तर नक्कीच खोकला कमी होऊन कालांकरानं जो पूर्णपणे थांबेलही. 


- कोरड्या खोकल्याची तक्रार असल्यास शरीरात पाण्याची पातळी योग्य प्रमाणात असणं तितकंच महत्त्वाचं. शिवाय ठराविक अंतरानं वाफ घेण्याचाही इथं फायदा होतो. 


- पिण्यासाठी कडकडीत गरम पाण्यापेक्षा कोमट पाण्याचा वापर केल्यास खोकल्यानं छातीत दुखणं कमी होतं. 


- खोकल्यामुळं घशात काही गिळताना त्रास होत असल्यास लहान घास किंवा पाण्याचे लहान घोट घ्यावेत. 


- लिंबू आणि मध साधारण गरम पाण्यात मिसळसून हे मिश्रण प्यायल्यास त्याचाही फायदा होताना दिसतो. 


- झोपताना डाव्या ऐवजी उजव्या कुशीवर झोपा. यामुळे कफ बाहेर निघण्यास मदत होते. 


- आलं, तुळस, मध अशा गोष्टींचा वापर करुन काढा घेतल्यास शरीराला आवश्यक तितकी ऊब मिळून खोकला कमी होतो. 


- आळशी भाजून ती साधारण कुरकुरीत करुन एका हवाबंद डब्यात भरुन ठेवावी आणि दिवसातून एकदा व्यवस्थित चावून खावी. 


- खोकला होत असल्यास लवंग तोंडात ठेवल्यासही आराम मिळतो. 


- एका चमचामध्ये लवंग पूड आणि मध यांचं चाटण करुन ते जिभेच्या टाळाच्या भागात चोळावं. काही क्षण तोंड बंद ठेवावं, असं दोन ते तीन दिवस केल्यासही खोकला कमी होतो.