मुंबई : बटाटा हा असा कंदमुळे आहे. जो आपल्याला सर्वच लोकांच्या स्वयंपाक घरात पाहायला मिळतो. तसेच याचा वापर वेज जेवणापासून ते अगदी नॉनवेज जेवणामध्ये केला जातो. तसेच भाजी व्यतिरिक्त बटाट्याचे अनेक स्नॅक्स बनवले जातात. जे सगळ्यांनाच खायला फार आवडतात. परंतु तुम्हाला माहितीय का, की बटाट्याचं जास्त सेवन केल्याने तुमच्या आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर तुम्ही देखील मोठ्या प्रमाणात बटाटे खात असाल, तर सावध व्हा, कारण यामुळे वजन वाढू शकते आणि मधुमेह होऊ शकतो. तसेच जर तुम्हीही बटाट्याचे जास्त प्रमाणात सेवन करत असाल तर काळजी घ्या, कारण तुम्हाला त्याची अॅलर्जी देखील होऊ शकते.


तुम्हाला माहिती आहे का की, बटाट्यामध्ये आढळणारे कार्बोहायड्रेट्स सांधेदुखीचा त्रास वाढवण्याचे काम करतात, त्यामुळे सांधेदुखीच्या रुग्णांनी बटाट्याचे जास्त सेवन करू नये.


मधुमेही रुग्णांना बटाट्याचे जास्त सेवन केल्याने समस्या आणखी वाढू शकतात. कारण बटाट्यामध्ये मोठ्या प्रमाणात शुगर असल्यामुळे तज्ज्ञ देखील त्याला न खाण्याचा सल्ला देतात.


तसेच फार कमी लोकांना हे माहित असेल की, बटाट्याच्या अतिसेवनाने देखील रक्तदाब वाढू शकतो. म्हणजेच बीपीच्या रुग्णांनी बटाट्याचे जास्त सेवन करू नये.


बटाट्यामध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते, यामुळे जास्त प्रमाणात कॅलरीज वाढतात आणि लठ्ठपणा येतो. त्यामुळे तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल, तर बटाटा खाणं टाळा.