आता `या` आजाराने वाढवली जगाची चिंता! एकाचा मृत्यू, काय आहेत लक्षणे?
Powassan Virus: कोरोनाच्या संकटामुळे जगभरात एकच खळबळ उडाली होती. कोरोनामुळे लाखो नागरिकांना आपले प्राण गमावले. अखेर या प्रतिबंधात्मक लस तयार करण्यात आली आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात जगाला यश आले. त्यानंतर सर्व व्यवहार सुरु झाले असतानाचा आता नव्या व्हायरसने जगाची चिंता वाढवली आहे.
Powassan Virus Symptoms in Marathi : कोरोनाच्या संकटामुळे जगभरात एकच खळबळ उडाली होती. कोरोनामुळे लाखो नागरिकांना आपले प्राण गमावले. अखेर या प्रतिबंधात्मक लस तयार करण्यात आली आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात जगाला यश आले. त्यानंतर सर्व व्यवहार सुरु झाले असतानाचा आता नव्या व्हायरसने जगाची चिंता वाढवली आहे.
कोरोना नंतर आता नवीन साथीच्या रोगाचा सामना जगाला करावा लागू शकतो. हा साथीचा रोग कोरोनापेक्षाही अतिशय धोकादायक असल्याचे सांगण्यात आले आहे. कोरोना, झिका आणि मंकीपॉक्सनंतर जगात आणखी एक धोकादायक विषाणू समोर आला आहे. पॉवसन (Powassan Virus Disease) असे या व्हायरसचे नाव आहे. याची लागण झाल्यामुळे अमेरिकेत एकाचा मृत्यू झाला आहे. या विषाणूवर अद्याप कोणतेही उपचार किंवा लस उपलब्ध झाली नाही. परिणाम हा पॉवासन रोग दुर्मिळ आणि गंभीर मानला जातो. यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जगभरातील आरोग्य तज्ज्ञांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
वाचा: Fish Lover सावधान! मासे खाल्ल्याने वाढतो कॅन्सरचा धोका? जाणून घ्या, कोणते मासे अधिक घातक...
याबाबत अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल प्रिव्हेंशनने (US Centers for Disease Control and Prevention) माहिती दिली असून, हा विषाणू टिक्स या लहान कीटकांच्या माध्यमातून पसरतो. अमेरिकेत दरवर्षी सुमारे 25 लोकांना या विषाणूची लागण होते. मात्र, आता यामुळे एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकेबरोबरच कॅनडा आणि रशियामध्येही या विषाणूचे रुग्ण दिसून आले आहे.
टिक्स द्वारे पसरतात
या विषाणूचा प्रसार टिक्स या कीटकांद्वारे पसरतो. हे परजीवी कीटक इतर प्राणी किंवा पक्ष्यांच्या रक्तावर जगतात. जंगलातील संक्रमित टिक्स चावल्यामुळे माणसांना या विषाणूची लागण होते. अमेरिकेत 2015 पासून आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या विषाणूचा संसर्ग मानवांमध्ये डियर टिक, ग्राउंडहॉग टिक किंवा स्क्विरल टिकद्वारे होऊ शकतो.
लक्षणे काय आहेत?
विषाणूची लागण झाल्यानंतर ताप, डोकेदुखी, उलट्या, अशक्तपणा यासारखी लक्षणे दिसून येतात. ही लक्षणे एक आठवडा ते एक महिन्यापर्यंत राहतात. हा आजार गंभीर टप्प्यापर्यंत पोहोचल्यास दीर्घकालीन आरोग्य समस्याही उद्भवू शकतात.
या आजारावर उपचार नाही
या आजारावर अद्याप कोणतेही उपचार उपलब्ध झाले नाहीत. अँटिबायोटिक्स घेतल्याने लक्षणे कमी करता येतात, परंतु पूर्ण उपचार शक्य नाही. म्हणूनच, संसर्ग टाळण्याचा प्रयत्न करणे हा एकमेव मार्ग आहे. यासाठी लांब बाही असलेले कपडे परिधान करा.