दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताच्या 72व्या स्वातंत्र्यदिनी  'जनआरोग्य योजने'ची घोषणा केली आहे. केवळ आर्थिक स्थिती हालाखीची असल्याने अनेकांना उपचार घेणं शक्य नसतं. परिणामी लोकांना जीव गमावावा लागतो. 


25 सप्टेंबरपासून होणार लागू 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंडित दिन दयाळ उपाध्याय यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून म्हणजेच 25  सप्टेंबरपासून पंतप्रधानांची जन आरोग्य योजना लागू होणार आहे. या योजनेमुळे देशातील 50 कोटी परिवारांना 5 लाख रूपयांचा हेल्थ विमा मिळणार आहे. ही सुविधा कॅशलेस असणार आहे. सध्या या सुविधेसाठी टेक्निकल टेस्टिंग सुरू आहे.  


 



कशी असेल सुविधा 


आयुष्मान भारत योजनेसाठी कोणत्याही वयाचं बंधन नसेल. या स्कीमचा हप्ता केंद्र आणि राज्य सरकारकडून दिला जाणार आहे. राज्य आणि केंद्र सरकार एकत्र मिळून या योजनेचे अवलंबन करणार आहे. द्रारिद्यरेषेखालील रूग्णांसाठी, भारतीयांसाठी ही योजना अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. उपचारांचा आर्थिक भार पेलू न शकणार्‍यांसाठी ही सुविधा अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.  


काय आहे आयुष्यमान भारत योजना ? 


2018-19च्या अर्थसंकल्पामध्ये आयुष्यमान भारत या योजनेची घोषणा करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत 50 कोटी भारतीय परिवरांना सुमारे 5 लाख रूपयांपर्यंतच्या मोफत हेल्थ इन्शुरंसची सोय मिळणार आहे. यामुळे उपचाराभावी कोणाचाही मृत्यू होऊ नये, किमान उपचार मिळावेत यासाठी सरकार प्रयत्न करणार आहे. प्रत्येकाला उपचार मिळावेत म्हणून कुटुंबातील सदस्य संस्थेवर किंवा वयाचं कोणतेही बंधन घालण्यात आलेले नाही.