पोट फुगणे किंवा गॅसची समस्या आहे? तर या गोष्टी खाणे टाळा
पोट फुगणे किंवा गॅस होणे सामान्य असले तरी अशा परिस्थितीत आपल्याला काही गोष्टी खाणे टाळले पाहिजे.
मुंबई : पोट फुगणे किंवा गॅस होणे सामान्य आहे. परंतु काही लोकांना नेहमी ही समस्या असते. या लोकांना नाश्ता केल्यावर, जेवण केल्यावर गॅसचा त्रास होतो. यामुळे, पोट दुखतं. यामागे आपला आहार आणि जीवनशैली ही मुख्य कारणे आहेत. पुरेसे पाणी न पिल्यानेही हे होऊ शकते. अशा परिस्थितीत आपल्याला काही गोष्टी खाणे टाळले पाहिजे.
चरबीयुक्त अन्न
तळलेल्या आणि जास्त चरबीयुक्त पदार्थ खाल्ल्याने पोटावर अतिरिक्त दबाव येतो. एवढेच नाही तर या गोष्टी खाल्ल्याने पोटदुखी, गॅस, अपचन या समस्या वाढतात. जर आपल्याला ब्लोटिंगची समस्या येत असेल तर आपण चरबीयुक्त पदार्थ खाणे टाळावे. या गोष्टी खाल्ल्यामुळे छातीत जळजळ होण्याची समस्या देखील उद्भवू शकते.
सोयाबीन
सोयाबीन हेल्दी मानली जाते यात काही शंका नाही, परंतु यामुळे गॅस देखील होऊ शकतो. जेव्हा आपले पोट हे पचन करण्याचा प्रयत्न करीत असते तेव्हा गॅसची समस्या वाढते. कारण ते पचण्यासाठी जड असते. जर आपल्याला पोट फुगण्याचा त्रास असेल तर सोयाबीन खाणे टाळले पाहिजे.
खारट गोष्टी
जास्त खारट पदार्थ खाल्ल्याने शरीरातून द्रव बाहेर पडत नाही, ज्यामुळे पोट फुगण्याचा त्रास होऊ शकतो. न्याहारीमध्ये चिप्सऐवजी निरोगी गोष्टी खा.
गहूचे पदार्थ
गव्हापासून बनवलेल्या वस्तू खाणे अनेकांना कठीण जाते. गव्हापासून बनवलेल्या गोष्टी खाल्ल्यानंतर तुम्हाला बहुतेकदा पोट फुगल्या सारखे वाटत असेल. मग ही लक्षणे सेलिआक नावाच्या रोगाचे असू शकते. ब्रेड, तृणधान्ये, बिस्किटे, पास्ता यासारख्या गोष्टी खाल्ल्यानंतर जर आपल्याला पोटाची समस्या उद्भवली असेल तर आपल्याला ग्लूटेन मुक्त आहार घेणे आवश्यक आहे. ग्लूटेन मुक्त आहार घेणे ही एक कठीण गोष्ट नाही. आता बरीच प्रकारच्या ग्लूटेन फ्री वस्तू बाजारात उपलब्ध आहेत.
कार्बोनेटेड पेय
बर्याच लोकांना असे वाटते की कार्बोनेटेड पेये पिण्यामुळे पोट फुगण्याच्या समस्येपासून मुक्तता होईल. परंतु असे नाही कारण प्रत्यक्षात उलट घडते. कार्बोनेटेड पेयांमध्ये कार्बन डाय ऑक्साईड वायूचे प्रमाण जास्त असते. जेव्हा आपण हे पेय घेतो. तेव्हा आपण जास्त प्रमाणात गॅस आत घेतो. जी आपल्या पाचन तंत्रासाठी हानिकारक असते.
या गोष्टी ही करा
1. जर आपण या गोष्टी सोडल्यानंतरही पोट फुगण्याची समस्या असेल तर, आहारात पाण्याचे प्रमाण वाढवा. आपण पुरेसे पाणी घेत नसल्यास, मूत्रपिंड पाणी टिकवून ठेवण्यास मदत करतात, परंतु यामुळे सूज येणे देखील होऊ शकते.
२. याशिवाय तुम्ही काय खाल्याने त्रास होतो. कशामुळे गॅसची समस्या उद्भवते, याकडे लक्ष द्या.
3. जेवण करताना आरामात जेवत जा. चावून चावून खात जा.