मुंबई : फिटनेस उद्योगात सर्वात जास्त वापरले जाणारे बॉडी बिल्डिंग सप्लिमेंट म्हणजे 'प्रोटीन सप्लिमेंट'. ज्या व्यक्तीला आपलं वजन वाढवायचं असतो, ती व्यक्ती या सप्लीमेंटच्या पर्यायांकडे वळते. त्यांना या मार्गाने वजन वाढवणे चांगले वाटते, परंतु तुम्हाला माहित आहे का की, हे असे सप्लिमेंट आपल्या शरीराला वेगवेगळ्या प्रकारे हानि पोहोचवतात? हो तुम्ही बरोबर एकलंत, आपण शरीर बलवान करण्यासाठी जे सप्लिमेंट खातो, ते सप्लिमेंट आपलं शरीर खराब करतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बरेच लोक व्यायामानंतर प्रोटीन पावडर पितात. तथापि, काही संशोधन असे सूचित करतात की, प्रोटीन पावडर घेण्याचे फायदे आहेत, परंतु याचे काही दुष्परिणाम देखील आहेत. हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या अहवालानुसार, एका अभ्यासात 134 प्रोटीन पावडरमध्ये 130 प्रकारची धोकादायक रसायने आढळून आली आहेत.


हार्वर्डशी संलग्न असलेल्या ब्रिघम आणि महिला रुग्णालयाच्या पोषण विभागाच्या संचालक कॅथी मॅकमॅनस म्हणतात की 'मी काही विशिष्ट प्रकरणांशिवाय प्रोटीन पावडर वापरण्याची शिफारस करत नाही. प्रोटीन पावडर केवळ तज्ञांच्या देखरेखीखाली घ्यावी.


तुम्ही देखील प्रोटीन पावडर सप्लिमेंट वापरत असाल तर हा लेख नक्की वाचा.


प्रोटीन पावडर म्हणजे काय?


ही पावडर घेण्यापूर्वी ती नक्की काय आहे? आणि त्याचा वापर काय आहे, हे जाणून घेणं जास्त महत्वाचं आहे. प्रोटीन पावडर पूरक पावडर स्वरूपात उपलब्ध आहेत. प्रोटीन पावडर अनेक स्वरूपात येते. जसे कॅसिन, व्हे प्रोटीन इ. प्रथिने पावडरमध्ये साखर, कृत्रिम स्वीटनर, जीवनसत्त्वे, खनिजे मिसळली जातात. 


बाजारात उपलब्ध असलेल्या प्रोटीन पावडरच्या एका स्कूपमध्ये 10 ते 30 ग्रॅम प्रोटीन असू शकते.


प्रोटीन पावडर घेण्याचा धोका काय?


न्यूट्रिशनिस्ट कॅथी मॅकमॅनस यांच्या मते, जर एखाद्याने प्रोटीन पावडर वापरली, तर त्याचे काही दुष्परिणाम होऊ शकतात. तथापि, पूरक आहारांच्या दुष्परिणामांवरील डेटा मर्यादित आहे. असे असले तरी प्रथिन पावडरचेही दुष्परिणाम होतात हे नाकारता येणार नाही.


प्रथिने पावडर पुरवणीच्या वेळेनुसार दुष्परिणाम दिसून येतात, मॅकमॅनस म्हणतात. याचे सेवन केल्याने पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. बहुतेक प्रथिने पावडर दुधापासून बनवल्या जातात. ज्या लोकांना दुग्धजन्य पदार्थांची ऍलर्जी आहे किंवा ज्यांना लॅक्टोज पचवता येत नाही, त्यांना पोटाचा त्रास होऊ लागतो.


तसेच अतिरिक्त साखरेचा शरीरावर अनेक प्रकारे परिणाम होऊ शकतो. या प्रोटीन पावडरमध्ये जास्त कॅलरी असल्याने वजन वाढू लागते आणि रक्तातील साखरेची पातळीही वाढते. अमेरिकन हार्ट असोसिएशनने महिलांसाठी दररोज 24 ग्रॅम आणि पुरुषांसाठी 36 ग्रॅम साखर खाण्याची शिफारस केली आहे.


हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या अहवालानुसार, 2020 मध्ये क्लीन लेबल प्रोजेक्ट नावाच्या ना-नफा गटाने प्रोटीन पावडरमधील विषारी पदार्थाविषयी एक अहवाल प्रसिद्ध केला. संशोधकांनी 134 प्रोटीन पावडर उत्पादनांची तपासणी केली आणि त्या उत्पादनांमध्ये 130 प्रकारचे विषारी पदार्थ असल्याचे आढळले.


याबद्दल न्यूट्रिशनिस्ट कॅथी मॅकमॅनस सांगतात की, "केमिकल फ्री प्रोटीन पावडर नेहमी घ्यावी. तसेच डॉक्टर किंवा तज्ञांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही सप्लिमेंट वापरू नका, पण तरीही मी शिफारस करेन की, प्रोटीन सप्लिमेंट्सऐवजी अंडी, नट, मांस, दही, मसूर, बीन्स, मासे, चीज इत्यादी प्रोटीनयुक्त पदार्थ खा."