मुंबई : लग्न हा केवळ दोन व्यक्तींचा निर्णय नसतो. लग्नात बांधल्यानंतर त्यांच्या आजूबाजूच्या, परिवारातील लोकांसोबतचीही नात्यामधील गुंफण बदलते. त्यामुळे लग्नाचा विचार करताना काही गोष्टींबाबत पारदर्शकता ठेवणं गरजेचे असते. यामुळे भविष्यात अनेक समस्या कमी होण्यास मदत होते. 


कोणते प्रश्न अवश्य विचाराल ? 


तयारी -


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्ही साथीदाराची निवड करण्यापूर्वी त्याला किंवा तिला लग्नासाठी मानसिक रूपाने तयार होत आहेत का? हे नक्की विचारून घ्या.  


नोकरी / करियर  -


तुमच्या साथीदाराची नोकरी आणि करियरच्या बाबतीत भविष्यात काय प्लॅन आहे ? हे नक्कीच सुरूवातीला बोलून स्प्ष्ट करा. तुमच्या आयुष्यात करियर कोणत्या टप्प्यापर्यंत महत्त्वाचं आहे, प्रायोरिटी आहे हे विचारून घ्या.  


पसंत / नापसंत -  


तुमच्या साथीदाराची पसंत-नापसंत विचारात घ्या. तुम्हांला कोणत्या बाबतीत किती तडजोड करता येते याबाबत बोलून घ्या. म्हणजे तुम्हांला दोघांच्या स्वभावाची त्यात होणार्‍या बदलांची कल्पना येईल.  


फॅमिली प्लॅनिंग 


वयाच्या कोणत्या टप्प्यावर आणि किती मुलांचा? कसा विचार करत आहात हे देखील तुम्ही सुरूवातीला बोलून स्पष्ट करणं फायदेशीर आहे. यामुळे हळूहळू तुम्ही मानसिकरित्याही त्यासाठी तयार व्हाल. 


कुटुंबाला प्राधान्य किती ?


लग्नानंतर तुम्ही एकत्र राहणार की वेगळे राहणार याबाबत सुरूवातीला स्पष्ट बोला. अनेकदा अचानक नव्याने घरात आलेल्या मुलीला आणि कुटुंबालाही त्याच्याशी जुळवून घेणं जमत नसल्यास त्यामुळे नात्यामध्ये तणाव येऊ शकतो.