Rare Disease: दुर्मिळ आजाराने ग्रस्त असलेल्या मुलीसाठी पाणी झाले अॅसिड, 2 वर्षांपासून फक्त ज्युसचा आधार
Latest Trending News: पाणी हे जीवन आहे असे म्हणतात. म्हणजेच पाण्याशिवाय मानवी जीवनाची कल्पनाच करता येत नाही, पण असेही होऊ शकते का की, पाणी एखाद्या मुलीसाठी जीवन नव्हे तर संकट ठरते. हे ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसला असेल. पण हे सत्य आहे.
वॉशिंग्टन : Latest Trending News: पाणी हे जीवन आहे असे म्हणतात. म्हणजेच पाण्याशिवाय मानवी जीवनाची कल्पनाच करता येत नाही, पण असेही होऊ शकते का की, पाणी एखाद्या मुलीसाठी जीवन नव्हे तर संकट ठरते. हे ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसला असेल. पण हे सत्य आहे. असाच काहीसा प्रकार अमेरिकेतील अॅरिझोना येथे राहणाऱ्या एका मुलीसोबत घडला आहे. या मुलीच्या शरीरात पाणी अॅसिडसारखे काम करते. काय आहे हे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया.
जगात या आजाराचे 100 रुग्ण
15 वर्षांची अबीगेल लहानपणापासून एक्वाजेनिक अर्टिकेरियाशी (Aquagenic Urticaria) झुंज देत आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार या आजाराने त्रस्त रुग्णाच्या शरीरावर अॅसिडसारखे पाण्याने नुकसान होते. याच्या धोक्याचा अंदाज यावरुन लावता येतो की याच्या रुग्णालाही डोळ्यांतून येणाऱ्या अश्रूंची अॅलर्जी होऊ लागते. जगभरात सुमारे 100 लोक या आजाराने ग्रस्त आहेत.
घरात कैद राहावे लागते
या आजारामुळे अबीगेलला उन्हाळ्यात तिच्या घरात कैद व्हावे लागते. याचे कारण म्हणजे घामामुळे शरीराचे नुकसान होते. केवळ घामामुळे होणारी अॅलर्जी टाळण्यासाठी अबीगेल घराबाहेर पडत नाही. जिम्नॅस्टिकची आवड असूनही तिला पोहता येत नाही किंवा जिम्नॅस्टिक अॅक्टिव्हिटी करता येत नाही.
एनर्जी ड्रिंक आणि ज्युसचा आसरा
डॉक्टरांच्या मते, हा आजार दुर्मिळ आहे आणि 20 कोटी लोकांपैकी एकाला तो आहे. हा आजार अनेकदा तरुण वयात दिसून येतो. पावसाळ्यात पाण्याला स्पर्श न करताही या रुग्णाला त्रास होऊ लागतो. अबीगेलच्या बाबतीतही असेच आहे. ती सांगते की या आजारामुळे ती जवळपास 2 वर्षांपासून पाणीही पिऊ शकलेली नाही. ती फक्त एनर्जी ड्रिंक्स किंवा डाळिंबाच्या रसाच्या आधारावर आहे.