मुंबई : गरोदरपणाचा काळ हा स्त्रियांच्या आरोग्यासाठी अत्यंत नाजूक असतो. या दिवसात स्वतः स्त्री आणि तिच्या आजूबाजूच्या व्यक्तीदेखील तिची फार काळजी घेतात. मात्र स्त्रियांच्या शरीरात कळत नकळत अशा काही गोष्टी घडत असतात की त्याचा परिणामही होऊ श्कतो याकडे अनेक स्त्रिया, तिच्या आजुबाजूच्या व्यक्ती, परिवारातील मंडळींसाठी नवा असतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गरोदरपणाच्या काळात शरीराच्या अवयवांमध्ये होणारे बदल, मॉर्निंग सिकनेस, उलट्या या लक्षणांसोबतच मूड स्विंग्सही होतात. महिलांमध्ये हे मूड स्विंग्स  होण्यामागे अनेक कारणं आहेत. 


का होतात गरोदर स्त्रीयांमध्ये मूड स्विंग्स ? 


मूड स्विंग्स होण्यामागील एक प्रमुख कारण म्हणजे शरीरात झपाट्याने होणारे बदल. 


गरोदरपणाच्या काळातील फिजिकल डिसकम्फर्ट 


गरोदरपणाच्या काळात विविध टप्प्यांवर वाढणारी भीती  


काही स्त्रियांमध्ये मूड स्विंग्स हे अत्यंत वेगाने होतात. बघता बघता हसणारी स्त्री रडायला लागते असे अनेकींचे अनुभव आहेत. 


कशी कराल मूड स्विंग्सवर मात ? 


1. झोप 


गरोदरपणाच्या काळात झोपेशी कधीच तडजोड करु नका. या काळात शरीरात होणारे बदल, सतत वॉशरूमला जाणं, वाढतं वजन, थकवा यामुळे झोप अत्यंत गरजेची आहे. 


झोपताना फार काळ त्रासदायक स्थितीत पडू नका. दिवसभरात सुमारे 8-10 तास आराम करणं आवश्यक आहे. 


दुपारच्या वेळेस पॉवर नॅप घ्या. यामुळे थकवा कमी होण्यास मदत होते. विकेंडला पुरेसा आराम करा. 


2. साथीदाराशी बोला  


तुमच्या इतकाच तुमचा साथीदारदेखील भविष्यात काय होईल याची काळजी करत असतो. त्यामुळे तुमच्यावरीण ताण एकटेच विचार करून वाढवण्यापेक्षा बोलून तो कमी करण्याचा प्रयत्न करा.  


3.गरोदर स्त्रीयांशी, मैत्रिणींशी बोला 


तुमच्या आजुबाजूला, नात्यामध्ये, मित्रपरिवारामध्ये गरोदर स्त्रिया असल्यास त्यांच्याशी बोला. तुमची भीती कमी होण्यास मदत होईल. त्यांच्यांसोबत काही वेळ घालवा, फिरायला जा. यामुळे ताण कमी होण्यास मदत होईल.