मुंबई : वटवाघुळांमुळे पसरणार्‍या 'निपाह' व्हायरसची सध्या देशभरात दहशत पसरली आहे. केरळ सरकारच्या माहितीनुसार 'निपाह'चा उद्रेक नियंत्रणात असला तरीही 15 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. फ्रुट बॅट्स या वटवाघुळाद्वारा 'निपाह' पसरतो. या वटवाघुळांद्वारा 'इबोला'ही पसरतो. 'निपाह'चा प्रसार वटवाघुळांंमुळे नव्हे - लॅब टेस्टच्या खुलाशाने गूढ वाढलयं !


आफ्रिकेत मोठा उद्रेक  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2014-16 या काळात पश्चिम आफ्रिकेत  इबोलाचा मोठा उद्रेक झाला. दरम्यान सिएरा, लिओन, गिनी आणि लायबेरिया या देशामध्ये इबोला हा जीवघेणा आजार  पसरला होता. इबोला झालेल्या रूग्णांमध्ये शरीरात रक्तस्त्राव होऊन मृत्यू होतो. मागील काही वर्षात 11 हजार लोकांचा मृत्यू झाला तर 28 हजार लोकांना इबोलाची लागण झाली होती. 


जीवघेणा 'इबोला' हद्दपार होऊ शकत नाही 


वटवाघुळ हे प्रमुख वाहक असले तरिही गोरिला, माकड, सायाळ, काळवीट हे प्राणीदेखील या रोगाचा प्रसार करतात. आफ्रिकेमध्ये मांस मोठ्या प्रमाणात खाल्ले जाते. इबोला हा आजार दुषित मांस किंवा रक्तामुळे मानवी शरीरात पसरतो. 


इबोल्या लक्षणामध्ये फ्लू सारखाच ताप येतो. या तापाकडे वेळीच लक्ष दिले जात नाही. परिणामी अल्पावधीत हा जीवघेणा आजार बळावतो. 
इबोलाग्र्स्त प्राण्यांमुळे हा आजार सतत पसरत राहणार आणि प्राण्यांना मारणं शक्य नसल्याने या आजार प्रगत औषधांच्या मदतीनेच नियंत्रण मिळवावे लागणार आहे. 


इबोलाग्रस्त रूग्णांना वेळीच उपचार मिळाल्यास ही साथ आटोक्यात ठेवण्यास मदत होईल.