मुंबई : अनेकदा काम करताना, टीव्ही पाहताना कानाजवळ डास भूणभूण करतात. डासांचा हा आवाज अत्यंत त्रासदायक असतो. डासांच्या या आवाजामुळे कामामध्ये लक्ष लागत नाही. पण हे डास चावणे जितकं त्रासदायक आहे तितकीच त्यांची भूणभूण कंटाळवाणी आहे. पण हे डास नेमकी अशी भूणभूण का करतात ? या '5' कारणांंमुळे विशिष्ट लोकांंनाच डास अधिक प्रमाणात चावतात !


का करतात डास भूणभूण ? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डास  आपल्या कानाजवळ जी भूणभूण करतात तो मूळात त्यांच्या पंखांचा आवाज असतो. डास फार वेगाने पंख फडफडवत असतात. डासांचे पंख अत्यंत लहान असतात. जेव्हा ते अत्यंत वेगाने त्याची उघडझाप करतात तेव्हा हा आवाज ऐकू येतो. हा आवाज लांबून ऐकता येऊ शकत नाही त्यामुळे डास कानाजवळ आला की तो भूणभूण आवाज येतो. 


डासांचा हा आवाज कशाचा संकेत ? 


काही वैज्ञानिकांच्या माहितीनुसार, डास या आवाजाद्वारा त्यांच्या विरूद्ध लिंगाचा शोध घेत असतात. डासांच्या पंखाची फडफड केवळ कानाच्या पडद्यांना नव्हे तर तुमच्या मेंदूच्या कार्यावरही प्रभाव टाकतात.  


डासांच्या या आवाजामुळे आपल्याला स्पर्शाची जाणीव असलेल्या पेशींना चालना मिळते. या आवाजामुळे लोकांना त्रास होतो. चिडचिड होते. डासांना पळवून लावतील हे घरगुती उपाय!