मुंबई : डार्क स्पॉट्सपासून सुटका मिळवणं हे अत्यंत काठीण आहे. आपण करत असलेल्या अनेक लहान सहान गोष्टींमुळे चेहर्‍यावर डार्क स्पॉट वाढतात. तुम्ही नकळत करत असलात तरीही या काही गोष्टी चेहर्‍यावर डार्क स्पॉट वाढवण्यास कारणीभूत ठरत आहेत. 


डार्क स्पॉट्स वाढण्यामागील कारणं - 


सूर्यप्रकाश -


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूर्यप्रकाशातील युव्ही किरणांमुळे त्वचेचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. त्वचेमध्ये मेलॅनिन घटकाचे प्रमाण वाढते. परिणामी डार्क स्पॉट्स वाढतात.  


लेझर किंवा पिलिंग - 


त्वचेचं सौंदर्य खुलवण्यासाठी तुम्ही लेझर किंवा पिलिंगचा वापर करता मात्र यामुळे त्वचेमध्ये दाह वाढतो. परिणामी काही जणांच्या त्वचेवर ब्राऊन रंगाचे पॅच निर्माण होतात. 


दाह -


हायपरपिगमेंटेशन निर्माण होण्यामागे त्वचेला मोठ्या प्रमाणात होणारा आघात हे एक कारण आहे. 


अ‍ॅक्ने -


चेहर्‍यावरील लहान स्वरूपातील ब्रेकआऊट्स पुढे पिंपल्स किंवा अ‍ॅक्नेच्या स्वरूपात बदलतात. अनेकांना चेहर्‍याला सतत हात लावण्याची सवय असते, खाजवणं, पिंपल्स फोडणं हा त्रास होऊ शकतो. 


औषधगोळ्या -


काही अ‍ॅन्टिबायोटिक्स आणि औषधगोळ्यांचा त्वचेवर परिणाम होतो. प्रामुख्याने संवेदनशील त्वचा सूर्यप्रकाशात गेल्यानंतर अधिक खराब होण्याची शक्यता असते. त्वचेवर अ‍ॅलर्जिक रिअ‍ॅक्शन होण्याची शक्यता असते.