मुंबई : पिंपल्स, व्हाईटहेड्सचा त्रास टाळण्यासाठी अनेक क्रीम्स, ब्युटी ट्रीटमेंट्स वापरणे निष्फळ ठरतात. यामागील एक कारण म्हणजे आपल्या काही चूका. अशापैकी एक म्हणजे सतत चेहर्‍याला हात लावणे. तुमच्या या सवयीमुळे अ‍ॅक्नेच्या ब्रेकआऊट्सचे प्रमाण वाढते. यामुळे पिंपल्सचा त्रास असणार्‍या तरूण-तरूणींमध्ये निराशेची भावना वाढते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपण जेवतो, ठिकठिकाणी नकळत हाताचा स्पर्श होतो असा हात सतत  चेहर्‍याला लागल्यास जंतूसंसर्गाची शक्यता वाढते. हजारो जंतू तुमच्याही  नकळत हा त्रास वाढवण्यास कारणीभूत ठरतात. अनेकजण दिवसभरात केवळ दोनदा चेहरा स्वच्छ करतात. त्यामुळे त्वचेचे नुकसान करण्यास जंतूंना पुरेसा वेळ मिळतो. 


तुमच्या या सवयीमुळे अ‍ॅक्नेची समस्या अजून बिघडू शकते. त्वचेवर घाम आणि सेबम एकत्र झाल्यास अ‍ॅक्नेची समस्या वाढीस लागते. यामुळे तुमची त्वचा पिंपल फ्री  होईलच असे काही नाही. मात्र त्याचे प्रमाण नक्कीच आटोक्यात राहण्यास मदत होईल. त्यामुळे तुम्हांला पिंपल्सचा त्रास असल्यास सतत चेहर्‍याला हात लावणे किंवा त्या नखांनी फोडणे टाळा. यामुळे चेहर्‍यावर डाग पडण्याची शक्यता असते.