मुंबई : थंडगारा वारा, सोबतीला पाऊस आणि मुंबईच्या समुद्रकिनारी असा  तर अनेकांना कणीस म्हणजेच मका खाण्याचा मोह अनेकांना आवरता येत नाही. मक्याला मीठ मसाला लावून गरमागरम कणीस खाण्याची मज्जा काही औरच असते. 
 
पावसाळ्यात केवळ रस्त्यावर मका खाणं मर्यादीत नाहीत तर अनेकजण घरीदेखील मका खातात. अवेळी लागणार्‍या भूकेवर मका खाणं हा एक उत्ताम पर्याय आहे. मात्र अनेकजण मका खाल्ल्यानंतर त्यावर पाणी पितात. पण ही एक चूक आरोग्याला त्रासदायक ठरू शकते. मक्याचे '५' आरोग्यदायी फायदे..


मक्यावर पाणी प्यायल्यास होतो त्रास  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयुर्वेदीक सल्ल्यानुसार, मका खाल्ल्यानंतर त्यावर पाणी पिऊ नका. यामुळे पोटदुखी आणि पचनाचा त्रास होतो. अनेकांना गॅस्ट्रिक त्रास होतात. लोकांमध्ये पोटफुगी, पोटात तीव्र वेदना जाणवतात. 


का होतो त्रास ? 


मक्यामध्ये 'कॉम्प्लेक्स कार्ब्स' आणि 'स्टार्च' घटक अधिक प्रमाणात असतात. यावर जेव्हा पाणी प्यायले जाते तेव्हा पचनाची क्रिया मंदावते. पोटात गॅस होतो. यासोबतच पोटफुगी, पित्त, पोटदुखीचा त्रास वाढतो. 


मका खाल्ल्यानंतर कधी प्याल पाणी ?  


मका खाल्ल्यानंतर सुमारे 45 मिनिटांनंतर पाणी प्यावे. मक्यावर लिंबू लावून खाणं त्याला चविष्ट आणि अधिक फायदेशीर बनवण्यास मदत करते.