Condoms : कंडोमचा वापर करावा लागू नये यासाठी पुरुष देतात `हे` बहाणे
जर्नल ऑफ सेक्स रिसर्चच्या (Journal of sex research) एका अभ्यासानुसार, 80 टक्के पुरुष कोणत्या ना कोणत्या कारणावरून कंडोम वापरण्यासाठी बहाणे देतात.
Reasons People Aren't Using Condoms : अनेकदा पुरुष कंडोम (Condoms) वापरण्यासाठी बहाणे देताना दिसतात. काही पुरुष विना कंडोम सेक्स (People Aren't Using Condoms) करणं पसंत करतात. मात्र कंडोमचा वापर न करणं तुम्हाला महागात पडू शकतं. जर तुम्हीही कंडोम वापरणं टाळत असाल, तर तुम्ही एकटे नाही आहात. जर्नल ऑफ सेक्स रिसर्चच्या (Journal of sex research) एका अभ्यासानुसार, 80 टक्के पुरुष कोणत्या ना कोणत्या कारणावरून कंडोम वापरण्यासाठी बहाणे देतात.
जाणून घेऊया पुरुष कंडोमचा वापर टाळण्यासाठी कोणते बहाणे देतात.
कंडोममुळे मजा कमी होते
काही पुरुष कंडोमचा वापर करणं टाळतात, कारण कंडोमच्या वापराने आनंद कमी होतो, असं मानतात. लेटेक्सच्या पातळ थराचा भावनांवर परिणाम होताना दिसतो. या मुद्द्यावर चर्चा करणाऱ्या व्यक्ती सामान्य पुरुषांच्या बाबतीत म्हणातात, पुरुषांच्या म्हणण्यानुसार, कंडोम वापरण्यासाठी हे कारण चुकीचं नाही
कार्यक्षमतेवर होतो परिणाम
काही प्रकरणांमध्ये पुरुषांना लेटेक्सची एलर्जी असते. मात्र अशा पुरुषांनी हा बहाणा देऊन चालणार नाही. त्यांनी लेटेक्स फ्री कंडोमचा वापर केला पाहिजे.
कंडोम अनेकदा फीट होत नाही
कंडोमचा वापर टाळण्यासाठी पुरुष अजून एक कारण देतात, ते म्हणजे कंडोम फीट बसत नाही. एका संशोधनातून असं समोर आलंय की, अभ्यासात सहभागी झालेल्या व्यक्तींनी कंडोम न वापऱ्याबाबत कारण दिलं की, त्यांना भीती वाटते, कंडोम फाटलं तर किंवा सरकलं तर.
कंडोम 'त्या' क्षणाला संपवतं
कंडोम रोमांचक किंवा रोमँटिक नसतं, हे नाकारता येणार नाही. बहुतेक लोक सहमत असतील की, कंडोम 'त्या' स्पेशल क्षणाचा नाश करतात.
विना कंडोम सेक्स केल्याने नात्यामध्ये विश्वास निर्माण होतो
अनेकजणं असा विचार करतात की, विना कंडोम सेक्स केल्याने असं काही होतं, ज्यामुळे जोडप्यामध्ये विश्वास निर्माण होतो. मात्र हे खरं नाहीये. जर तुम्ही कंडोमचा वापर करत असाल, तर तुम्ही तुमच्या पार्टनरला दाखवून देता की, तुम्हाला त्याची किती काळजी आहे. तुम्ही असुरक्षित शारीरिक संबंधाद्वारे पार्टनरसोबत विश्वास निर्माण करू शकत नाही.