मुंबई : कोणत्याही नात्यात विश्वास महत्त्वाचा असतो. नात्यातील विश्वासच नाते मजबूत करतो. आणि नाते जर पती-पत्नीचे असेल तर? मग तर विश्वास हवाच. पण विश्वासाची जागा शंकेने घेतली तर नाते तुटू शकते किंवा नात्यात समस्या उद्भवू लागतात. काही अगदी साध्या गोष्टी असतात. पण त्यामुळे नाते बिघडू शकते किंवा शंकेला जागा निर्माण होते. जाणून घेऊया त्याबद्दल...


एकमेकांशी कमी बोलणे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर पत्नी पतीसोबत कमी बोलत असेल आणि इतरांशी मनमोकळ्या गप्पा मारत असेलतर पुरुषांच्या मनात शंका डोकावू लागते. तसंच पुरुषांच्या मनात काही असेल तर ते पटकन व्यक्त करत नाही आणि गोष्टी मनातल्या मनात ठेवल्याने शंका वाढू लागते. अशी काही शंका वाटत असल्यास बोलून तिचा निचरा करा. गोष्टी मनात ठेवल्याने नाते दुषित होऊ शकते.


सारखे मोबाईल पाहणे


वेळ मिळताच जर पत्नी हातात मोबाईल घेत असेल आणि त्यातच वेळ घालवत असेल तर पतीच्या मनात शंकेची पाल चुकचुकते. मग ती फोन चेक करत असो किंवा त्यावर गेम्स खेळत असो, पुरुषांच्या मनात विविध विचारांचे काहूर माजते.


नटणे थटणे


प्रत्येक महिलेला नटायला फार आवडते. पण काही महिलांची ही सवय पुरुषांना खटकते आणि त्यांच्या मनात शंका घर करु लागते.


दुसऱ्या पुरुषांची मनमोकळ्या गप्पा मारणे


पत्नी जर इतर पुरुषांची मनमोकळ्या गप्पा मारत असेल तर पतीच्या मनात शंका उत्पन्न होते. खरंतर ते त्याला सहन होत नाही. मनातल्या मनात भीती, शंका सतावत राहते. 


पतीच्या अनुपस्थितीत बाहेर जाणे


पतीच्या अनुपस्थितीत पत्नी फ्रेंड्सना भेटायचा सारखा सारखा प्लॅन करत असेल तर पतीच्या मनात शंका येऊ लागते. मला सांगूनही ती जावू शकत होती, हा प्रश्न त्यांच्या मनात उभा राहतो.