Relationship Tips : आजकाल रिलेशनशिप म्हटलं की अनेकांना हा खेळण्यातला खेळ वाटतो. ब्रेकअप आणि परत पॅचअप या सगळ्या गोष्टी तर सहजतेनं होतात. तर दुसरीकडे काही कपल्स आहेत जे अनेक वर्षांपासून सोबत आहेत तरी सुद्धा त्यांच्यातील प्रेम हे कमी होत नाही. तर असे देखील काही कप्लस आहेत जे अनेक वर्षे सोबत राहिल्यानंतर त्यांच्यातील प्रेम कमी झालं आहे. बऱ्याचवेळा असं होतं की लॉंग डिस्टन्स रिलेशनशिपमुळे कपल्समध्ये दुरावा येतो. अशात आज आपण अशा गोष्टी जाणून घेणार आहोत ज्यामुळे तुमच्या रिलेशनशिपमध्ये दुरावा येण्याची कारणं ठरू शकतात. जर या सगळ्या गोष्टी तुम्ही वेळवर जाणून घेतल्या नाही तर तुमचे प्रेम तुमच्यापासून लांब जाऊ शकते. त्यामुळे चला तर जाणून घेऊया कोणत्या गोष्टींमुळे तुमच्या रिलेशिनशिपमध्ये दुरावा येऊ शकतो. (What things weaken the relationship) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुमचा साथीदार तुम्हाल सोडून जाईल ही भीती 
जर कोणत्या कपलमध्ये दोघांपैकी एक व्यक्ती ही इनसिक्योर असेल तर ती प्रत्येक गोष्टीसाठी घाबरू लागते. उदा. जर त्यानं मला गिफ्ट्स दिले तर का दिले असतील? काय कारण असेल? त्याला माझ्यापासून काही लपवायचं आहे का? त्यामुळे त्या व्यक्तीला भीती वाटते की मला माझा पार्टनर मला सोडून जाईन. त्यामुळे व्यक्ती संशयी होते. त्यामुळे देखील नात्यात दुरावा येऊ लागतो. त्यामुळे कधीच कोणत्या गोष्टी लपवू नका. 


हेही वाचा : Nails : जर तुमच्या नखांवर आहेत 'अशा' खुणा तर होऊ शकते मोठे नुकसान


एकमेकांना वेळ न देणं (Not Giving Time To Each Other)
कोणत्याही नात्यात एकेमकांना वेळ देणं हे खूप महत्वाचं असते. जर कपल्स एकमेकांसोबत क्वालिटी टाईम व्यथित करत नसतील, त्यांनी एकमेकांशी संवाद साधला नाही,  तर त्यामुळे दोघांमधील बॉन्डिंग कमी होऊ शकते. आजकालच्या व्यस्त आणि धकाधकीच्या जीवनशैलीमुळे जोडप्यांना एकमेकांना पुरेसा वेळ देणं कठीण होत चाललं आहे. याचा परिणाम नातेसंबंधावर होत आहे, गैरसमज, भांडण  या कारणांमुळे नात्यामध्ये असलेला गोडवा, प्रेम हळू हळू नष्ट होऊ लागते. 


एकमेकांवर विश्वास नसने (Trust Issue)
कोणतंही नातं म्हटलं तर विश्वास हा महत्वाचा असतो... मग ती मैत्री असो किंवा मग ऑफिसमध्ये आपल्या सह-कलाकारासोबत काम करताना. या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिलेशनशिपमध्ये असताना संशय, असुरक्षितता वाटणं या सगळ्या गोष्टींमुळे नात्यात हळूहळू दुरावा येऊ लागतो. ही भांडणांची कारणं देखील ठरू शकतात.  


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)