डेंग्यूपासून बचावासाठी करा `हे` उपाय
महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आल्या काही सुचना.
मुंबई : पावसाळ्यामध्ये अनेक साथीचे रोग डोकंवर काढतात. त्याचप्रमाणे पावसाळ्यात सतत होणाऱ्या वातावरणातील बदलामुळे आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम देखील होताना दिसतो. पावसाळ्यात डबक्यांमध्ये साचणाऱ्या पावसाच्या पाण्यावर घोंगवणाऱ्या मच्छरांचे प्रमाण मोठ्या देखील फार मोठे असते. पावसाळ्यात डेंग्यूची लागण फार लोकांना होते. डेंग्यू झाल्यावर ब्लड प्लेटलेट्स अगदी पटापट कमी होतात. पावसाळ्यात आहारात संतुलीत आहाराचा समावेश करणे फार महत्वाचे असते.
डेंग्यूचा ताप सध्या सगळीकडे पसरत आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाकडून काही सूचना जारी करण्यात आल्या आहेत. गुडघ्यापासून ते पायाच्या पंज्यापर्यंत खोबऱ्याचे तेल लावण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून नागरिकांना करण्यात आले आहे. हे तेल सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत एन्टीबायोटीकचं काम करते. कारण डेंग्यूचा मच्छर गुडघ्यापेक्षा वर उडू शकत नाही.
जेव्हा, डेंग्यू या रोगाची लागण होते, तेव्हा मानवी शरीरातील प्लेटलेट्सचे प्रमाण कमी होते. त्यामुळे आहारात १२ ते १५ काळे खजूर, एक किवी फळ, १ ते २ चमचे पपईच्या पानाचा रस समावेश करावा. त्यामुळे शरीरातील प्लेटलेट वाढतात परिणामी डेंग्यूची समस्या दुरावते.