स्वयंपाकघरात या वस्तू असल्यास लगेचच हटवा
स्वयंपाकघरातील या वस्तूंमुळे कॅन्सर होण्याचा मोठा धोका असतो.
मुंबई : आपल्या स्वयंपाकघरात काही अशा गोष्टी असतात ज्याच्या वापराने आपल्याला कॅन्सर होण्याचा धोका असतो. त्यामुळे किचनमध्ये असणाऱ्या काही गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक जण जे अधिक सोईस्कर आहे त्याचा वापर करतात. परंतु त्या गोष्टी आपल्या आरोग्यासाठी कितपत योग्य आणि अयोग्य आहेत याची अनेकांना माहिती नसते. त्यामुळे स्वयंपाकघरातील अशा गोष्टींमुळे कॅन्सरसारखा मोठा गंभीर आजार होण्याचा धोका असतो.
रिफाइन्ड ऑइल : तेल रिफाइन करण्याच्या प्रक्रियेसाठी अनेक अॅसिडचा वापर केला जातो. उग्र वास घालवण्यासाठी हेक्सानॉल नावाच्या एका केमिकलचा वापर केला जातो. जेव्हा एखादा पदार्थ तळण्यासाठी प्रोसेस रिफाइन्ड तेलामध्ये गरम केला जातो त्यावेळी ते ट्रान्स फॅट ऑक्सीडाइज रिलीज करत असतं. जे शरीरासाठी अतिशय हानीकारक आहे. यामुळे हृदयरोग आणि कॅन्सर होण्याचा मोठा धोका असतो.
प्लास्टिकची बाटली : प्लास्टिकच्या बाटलीच्या नियमीत वापराने रोगप्रतिकारशक्ती आणि हार्मोन्स प्रभावित होत असतात. लठ्ठपणा वाढण्याची शक्यता असते. प्लास्टिकच्या डब्यात जेवण गरम केल्याने जे टॉक्सिन्स बाहेर पडतात त्यामुळे इंन्सुलिनचे प्रमाण वाढते. त्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता वाढते.
नॉन-स्टिक : उच्च तापमानावर नॉन स्टिक भांड्यात जेवण केल्यास भांड्यातून निघणारे PFCs कोटिंगला प्रभावित करतात. ज्यामुळे लिव्हर आणि पचनक्रिया बिघडण्याची शक्यता असते. तसंच कॅन्सरही होण्याचा धोका संभवतो.
अॅल्युमिनियम फॉईल : अॅल्युमिनियम फॉईलमध्ये पॅक केलेल्या जेवणात जवळपास २-५ मिलीग्रॅम अॅल्युमिनियम असतं. जे शरीरासाठी अतिशय घातक ठरतं.