`लिव्हर डिटॉक्सच्या नावाखाली 3 कोटी चाहत्यांची फसवणूक!` डॉक्टराकडून गंभीर आरोप
Samantha Ruth Prabhu : समांथा रुथ प्रभूचा एक पॉडकास्ट शेअर करत डॉक्टरानं केले गंभीर आरोप... व्हिडीओ होतोय व्हायरल
Samantha Ruth Prabhu : दाक्षिणाच्य लोकप्रिय अभिनेत्री समांथा रुथ प्रभू ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या पॉडकास्टमुळे चर्चेत आहे. सोशल मीडियावर नुकताच तिनं एक पॉडकास्ट शेअर केला असून त्यावरुन मोठी कॉन्ट्रोव्हर्सी सुरु झाली आहे. इतकंच नाही तर तिच्यावर एका डॉक्टरनं तिच्यावर 33.2 मिलियन फॉलोवर्सची फसवणूक करण्याचा आरोपही केला आहे. चला तर जाणून घेऊया काय आहे संपूर्ण प्रकरण...
समांथानं तिचं एक पॉडकास्ट सुरु केलं असून त्यात ती एका मेडिकल एक्सपर्टसोबत लिव्हर डिटॉक्सविषयी बोलताना दिसते. या व्हिडीओत दिलेली माहिती पाहता लिव्हर डॉक्टरानं सोशल मीडियावर तिचा व्हिडीओ शेअर करत तिला ट्रोल केलं आहे.
काय म्हणाली समांथा आणि मेडिकल एक्सपर्ट?
या पॉडकास्टमधीळ एक क्लिप व्हायरल होते. त्यात मेडिकल एस्कपर्ट असलेले अलकेश म्हणाला की 'काही वनऔषधी (Herbs) आहेत जे तुमच्या लिव्हरचं आरोग्य चांगलं करतात. त्यानं याविषयी सविस्तर सांगत डेंडेलाइनचं उदाहरण दिलं. डेंडेलाइनची मुळं तुमच्या लिव्हरला निरोगी ठेवतं.'
संतप्त डॉक्टरांनं दिली प्रतिक्रिया
समांथाचा पॉडकास्ट पाहिल्यानंतर The Liver Doc नं शेअरं केला. त्यानं दिलेली ही सगळी माहिती चुकीची आहे. समांथा ही कोट्यावधी लोकांना मुर्ख बनवते. ही समांथा रुथ प्रभू असून ती फिल्मस्टार आहे. ही लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी जी माहिती दिली आहे ती चुकिची आहे. पॉडकास्टमध्ये आरोग्याविषयी काही चुकिची बातमी दिली आहे. 'वेलनेस कोच आणि परफॉरमेंस न्यूट्रिशनिस्ट' यात सामिल आहे. ज्यांना माणवाचं शरीर कसं काम करते हे माहित नाही आणि त्यांच्या इन्स्टाग्राम हॅन्डवर सगळ्यात बकवास माहिती आहे. कोणत्या वनऔषधींमुळे ऑटोइम्यून डिसऑर्डरवर योग्य आहे, ही चुकीची माहिती आहे. माझा विश्वास बसत नाही की एवढ्या मोठ्या प्रमाणात फॉलोअर असणारे लोक सर्वात वाईट, अशिक्षित लोक कसे सहज अशी माहिती देतात. त्यांना 'हेल्थ पॉडकास्ट' वर विज्ञान, औषध आणि आरोग्याबद्दल बोलण्यासाठी कसे आमंत्रित केले जाऊ शकते, ज्यांचा प्रत्यक्षात आरोग्य किंवा औषधाशी काहीही संबंध नाही. हे फक्त दोन विज्ञान निरक्षर लोक त्यांचे चुकिची माहिती शेअर करत आहेत. वेलनेस कोच असणारी व्यक्ती खरं तरी खरा डॉक्टर नसतो आणि अशी शक्यता ही असेल की त्यांना लिव्हरविषयी जास्त माहिती नाही. ते म्हणतात की लिव्हरचं आरोग्य सुधारण्यासाठी सगळ्यात चांगलं वनऔषध हे डेंडेलाइन आहे. मी एक लिव्हर डॉक्टर आहे. एक प्रशिक्षित आणि रजिस्टर्ड हेपेटोलॉजिस्ट आहे. एका दशकापासून लिव्हर संबंधीत आजार असलेल्यांचा उपचार करतोय. मी हे सांगू शकतो की यात सांगण्यात आलेल्या सगळ्या गोष्टी खोट्या आहेत.