मुंबई : डायबेटीजच्या रूग्णांना नियमितपणे ब्लड शुगरची तपासणी करावी लागते. ब्लड शुगरद्वारे मधुमेहाची स्थिती समजण्यास मदत होते. ब्लड शुगर तपासण्यासाठी ग्लुकोमीटरचा वापर केला जातो. ग्लुकोमीटर रूग्णाच्या बोटाला लावून ब्लड त्याचं ब्लड सँपल घेतलं जातं. ब्लड सँपल घेताना काहीशा वेदना होतात. मात्र या वेदना दूर करण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या संशोधकांनी एक नवा शोध लावला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वैज्ञानिकांनी ब्लड शुगर टेस्ट करण्यासाठी अशा पद्धत आणली आहे ज्यामध्ये बोटाला सुई टोचण्याची गरज भासणार नाहीये. यामध्ये वैज्ञानिकांनी एक अशी पट्टी बनवली आहे जी लाळेद्वारे ब्लड शुगरच्या मात्रेची माहिती देणार आहे. यामुळे सुई टोचण्यामुळे होणाऱ्या वेदनांपासून मुक्ती मिळणार आहे.


ब्लड शुगर टेस्ट करण्यासाठी रूग्णांना अनेकदा बोटाला सुई टोचावी लागते. यामुळे दिवसातून त्यांना अनेकदा वेदनांचा सामना करावा लागतो. या वेदनेमुळे काही रूग्ण टेस्ट करणंही टाळतात.ऑस्ट्रेलियाच्या न्यूकैसल विश्वविद्यालयचे प्रोफेसर पॉल दस्तूर यांच्या म्हणण्यानुसार, या नव्या पद्धतीने करणाऱ्या टेस्टमध्ये एंजाइम एम्बेड होतात. एका ट्रांसिशनमध्ये ग्लुकोजची ओळख केली जाऊ शकते. हे शरीरातील ग्लुकोजची मात्रा सांगतं.


प्रोफेसर दस्तूर यांनी सांगितलं की, "तोंडाच्या लाळेत ग्लुकोज असतं. हे ग्लुकोज कंसंट्रेशनच्या माध्यमातून ब्लड ग्लुकोजची माहिती सहजरित्या देतं. आम्हाला एक अशी टेस्टिंग तयार करायची होती जी कमी खर्चाची, बनवण्यासाठी सोपी असेल."


वैज्ञानिकांच्या सांगण्यानुसार, क्लिनिकल ट्रायल पास झाल्यानंतर यावर काम सुरु करण्यात येईल. या पद्धतीच्या माध्यमातून COVID-19 आणि एलर्जेन, हार्मोन्स और कँसरची तपासणी केली जाऊ शकते.