नवी दिल्ली : मानवी शरीरातील अवयवांची अधिकतर नावे आपल्याला माहित आहेत. मात्र मानवी शरीरातील एका नव्या अंगाचा शोध लावल्याचा दावा वैज्ञानिकांनी केला आहे. मेडिकल सायन्समधील हे सर्वात मोठे यश असल्याचे मानले जात आहे. या मानवी अंगामुळे शरीरात कॅन्सर कसा पसरत जातो, याचा शोध लावणे सोपे होणार असल्याचा दावा केला जात आहे. शरीरातील हे अवयव महत्वपूर्ण असून सर्वांच्या शरीरात ते सर्वांच्या शरीरात आहे. 
वैज्ञानिकांनुसार, आपल्या शरीरात त्वचेच्या आत एक थर असतो. या थराला उत्तक म्हणजे टिशू म्हणतात. या टिशूच्या आत तरल पदार्थांनी भरलेले विभाग असतात. वैज्ञानिकांनी याला इंटरस्टीशिअम असे नाव दिले आहे.


काय आहे इंटरस्टीशिअम?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, इंटरस्टीशिअम फक्त त्वचेच्या खाली नाही तर आतडे, फुफ्फुसे, रक्तवाहिन्या, त्वचेच्या पेशी यांच्या खालीही असते. हे अत्यंत लवचिक असून यात प्रोटीनचा मोठा थर असतो. वैज्ञानिकांनीनुसार, इंटरस्टीशिअम शरीराच्या टिशूजच्या संरक्षणाचे काम करते. या नव्या मानवी शरीराच्या अवयवाबद्दलचा लेख सायंटिफिक रिपोर्ट्स जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे.


कशी मिळवली माहिती?


माऊंड सिनाय बेथ इजरायल मेडिकल सेंटर मेडिक्सचे डॉ. डेविड कार-लॉक आणि डॉ पेट्रोस बेनियासने यांनी सांगितले की, यावरुन माहिती मिळते की, शरीरात कॅन्सर कसा पसरतो ते. यासाठी डॉक्टरांनी पित्त वाहिनीची तपासणी केली. तपासादरम्यान त्यांची नजर या विशेष प्रकारच्या टिशूवर पडली आणि इंटरस्टीशिअमचा शोध लागला. त्याचबरोबर हे
शरीरातील सर्वात मोठे अंग असल्याचा दावा वैज्ञानिकांनी केला आहे. 


अनेक वर्षांपासून मानवी शरीरावर होत आहे संशोधन


मानवी शरीराची रचना अत्यंत गुंतागुंतीची आणि अद्भूत आहे. यावर अनेक वर्षांपासून संशोधन होत आहे.