खाद्यपदार्थांसोबत चमचे, प्लेट्सही खाता येणार
इग्लंड येथील एका उपक्रमाद्वारे समुद्री शेवाळापासूनही पाण्याचा ग्लासही बनविण्यात आला आहे.
मुंबई : जगभारत लाकूड आणि इतर धातूंना पर्याय म्हणून प्लास्टीकची निर्मिती करण्यात आली. पण, हा प्रयोग अंगाशी येऊन पर्यावरणाची समस्या निर्माण होऊ शकते हे ध्यानात येताच आता प्लास्टिकचा वापर नियंत्रणात कसा आमता येईल. तसेच, त्याला पर्याय कसा देता येऊ शकेल याबाबत चर्चा सुरू झाली आहे. याचा भाग म्हणून आता खाद्य पदार्थ खाता चमचे आणि प्लेटच्या रूपात होणाऱ्या प्लास्टिकला आळा घालण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामुळे आता चमचे आणि प्लेट यांची अशी निर्मिती करण्यात आली आहे की, ज्या खाद्यपदार्थाचाच एक भाग असतील. म्हणजेच असे की, खाद्यपदार्थ खाऊन झाल्यावर तुम्हाला चमचे आणि प्लेट्सही खाता येणार आहेत.
दरम्यान, इग्लंड येथील एका उपक्रमाद्वारे समुद्री शेवाळापासूनही पाण्याचा ग्लास बनविण्यात आला आहे. 'द गार्डियन' नावाच्या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, प्लास्टिक ही एक जागतीक समस्या बणू शकते. त्यामुळे प्लास्टीकला पर्याय असलेल्या अशा प्करारच्या पाणी बॉटल, चमचे , प्लेट्सचा प्रयोग जर यशस्वी झाला तर, तो जगासाठी फायदेशीरअसणार आहे. दरम्यान, समुद्री शेवाळापासून तयार करण्यात आलेल्या सामग्रिपासून बर्गर आणि नुडल्स पॅक करण्याचाही प्रयत्न गेल्या महिन्यात इग्लंडमध्ये झाल्याचे गार्डियनने म्हटले आहे.
विशेष असे की, हैदराबाद येथील ने नाराणय पीसपती यांनीही असे चमचे आणि प्लेट्स यांची निर्मिती केली आहे. या प्लेट्स निर्मिती करण्यासाठी मोठ्या वनस्पतीच्या पिठाचा वापर करण्यात आला आहे. ज्या तुम्हाला तुमचे जेवन संपले की खाता येऊ शकतात