Symptoms Of High Cholesterol: चुकीची जीवनशैली आणि अयोग्य आहाराच्या सवयी यामुळे अनेक आरोग्यासंबंधीच्या व्याधी आपल्या मागे लागतात. यामधील एक समस्या म्हणजे हाय कोलेस्ट्रॉल. आजकाल तरूण वयात देखील ही समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येतेय.  कोलेस्ट्रॉल हा आपल्या रक्तात आढळणारा एक चिकट पदार्थ असतो. आपल्या शरीरात दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल असतात. यामधील पहिलं चांगलं कोलेस्ट्रॉल आणि दुसरे वाईट कोलेस्ट्रॉल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, शरीराच्या चांगल्या कार्यासाठी चांगले कोलेस्ट्रॉल आवश्यक आहे. याउलट दुसरीकडे खराब कोलेस्ट्रॉल शरीरासाठी हानिकारक मानलं जातं. जेव्हा शरीरात खराब कोलेस्टेरॉलची पातळी वाढते तेव्हा ते रक्तवाहिन्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात होतं आणि रक्तवाहिन्या ब्लॉक करतात. त्यामुळे हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि हृदयाशी संबंधित इतर गंभीर आजारांचा धोका वाढतो. मात्र जर एखाद्या व्यक्तीच्या शरीरात वाईट कोलेस्टॉलटी पातळी वाढली असेल तर शरीरातील काही भागांमध्ये अचानक वेदना जाणवू लागतात. ही लक्षणं काय आहेत, ती जाणून घेऊया. 


पाठीमध्ये वेदना होणं


कोलेस्ट्रॉल वाढल्याने पाठीच्या खालच्या भागात तीव्र वेदना होऊ शकतात. ज्यावेळी रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते तेव्हा पाठीच्या खालच्या भागात वेदना होऊ शकतात. 


जबड्यात वेदना होणं


जर तुम्हाला अनेक दिवसांपासून जबड्यात दुखत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. हे उच्च कोलेस्ट्रॉलचं लक्षण असू शकतं. जेव्हा रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल जमा होतं त्यावेळी जबड्यातील रक्ताभिसरण ब्लॉक होतं. अशावेळी जबडा आणि मान मध्ये वेदना जाणवू शकतं. 


छातीत वेदना होणं


शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे छातीत दुखू शकतं. यामध्ये हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या नसांमध्ये वाईट कोलेस्ट्रॉल जमा झाले की, रक्ताभिसरण प्रभावित होते. यामुळे तुम्हाला छातीत दुखू शकतं. 


पायांमध्ये वेदना होणं


शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यामुळे पाय दुखू शकतात. रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल जमा झाल्यामुळे पायांच्या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, ज्यामुळे पाय दुखतात. यावेळी पायांमध्ये इतक्या वेदना होऊ शकतात की, व्यक्तीला चालणंही कठीण होतं. जर तुम्हाला अशी लक्षणे दिसली तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.


(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)