मुंबई : स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांच्या लौंगिक आरोग्याबाबत आपल्याकडे फारशी चर्चा होत नाही. मात्र पुरुषांच्या आरोग्याची चर्चा त्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीपुरतीच मर्यादित राहिल्याचं आपल्याला आढळून येतं. स्त्रियांप्रमाणेच पुरुषांनादेखील लैंगिक समस्यांचा सामना करावा लागतो. योग्य वजन असलेल्या पुरुषांपेक्षा लठ्ठ पुरुषांचा स्पर्म काउंट बऱ्यापैकी कमी असतो, याची फार लोकांना कल्पना नसते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुरुषांच्या लौंगिक आरोग्यासंदर्भात बरेच गैरसमज आहेत. पुरुष किती सुदृढ आहेत यावर ते प्रजनन करण्यास सक्षम आहेत की नाही हे ठरतं. त्यांची तब्येत चांगली असेल तर त्यांचा ‘स्पर्म काउंट’ म्हणजेच त्यांच्या वीर्यातल्या शुक्राणूंची संख्या जास्त असते. 


लौंगिक आरोग्याची काळजी कशी घ्यायची याची माहिती बऱ्याचदा पुरुषांना नसते. लैंगिक आरोग्याची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. पुरुषांचं लैंगिक आरोग्य चांगलं राहावं यासाठी 3 टिप्स दिल्या आहेत.


लैंगिक संक्रमित रोगांसंदर्भात नियमित तपासणी


पुरुषांमध्ये एचआयव्ही, सिफिलिस, हर्प्सिस यांसारख्या सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीसबद्दल पुरेशी जागरूकता असली पाहिजे. अजून तरी त्यांच्यावर कुठली लस आलेली नाही. या रोगांपासून आपलं संरक्षण करण्यासाठी त्यांना प्रतिबंध घालणं हा एकमेव मार्ग आपल्याकडे आहे.


वैयक्तिक स्वच्छता राखा


शरीरातील नाजूक भागांसाठी कुठल्याही प्रकारचं केमिकल प्रॉडक्ट्स वापरणं टाळा. कॉटनसारख्या चांगल्या प्रकारे हवा खेळती राहील अशा कापडांची अंतर्वस्त्रं शक्यतो घाला. शिवाय आंतरकपडे फार घट्ट होणार नाहीत याची खात्री करून घ्या.


धूम्रपान करणं सोडा 


अनेक प्रकारच्या अभ्यासांमधून असं समोर आलंय की, धुम्रपान केल्याने त्याचा वाईट परिणाम तुमच्या स्पर्म्सवर होतो. त्यामुळे धूम्रपान करणं टाळा.