मुंबई : आजकाल धावपळीच्या जीवनामुळे आपण आरोग्याकडे योग्य लक्ष देत नाही. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे (Eating Bad Habits) आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. वाढत्या वयानुसार पुरुषांची शारीरिक ताकद (Physical Strength) देखील कमी होत जाते. ज्यामुळे लैंगिक संबंधांमध्ये (Sexual Relations) देखील समस्यांचा सामना करावा लागतो. पण ही समस्या दूर करण्यासाठी आहारात तुम्ही काही गोष्टींचा समावेश करु शकतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केळी


केळी ही आरोग्यासाठी खूपच चांगली असते. यात प्रोटीन, फायबर आणि कॅल्शियम असतं. ज्यामुळे शारीरिक दुर्बलता दूर होते. शिवाय ताकद वाढवण्यात ही ती मदत करते.


अंडी


पुरुषांनी अंडी खाली पाहिजेत. अंडी शरीराला भरपूर पोषक घटक आणि ऊर्जा प्रदान करते. यामुळे थकवा दूर होतो.


दूध


दुधात असलेल्या प्रोटीन आणि कॅल्शियममुळे स्नायू आणि हाडं मजबूत होतात. पुरुषांनी दररोज एक कप दूध प्यावं. ज्यामुळे पुरुषांमधील शारीरिक कमजोरी दूर होते. 


मका


लैंगिक ताकद वाढवण्यासाठी मका उत्तम मानला जातो. यामध्ये 'व्हिटॅमिन बी' असल्यामुळे शरीरातील ऊर्जा वाढण्यास मदत होते.


कांदा


कांदा खाल्याने लैंगिक अवयवांमध्ये रक्त प्रवाह वाढतो. ज्यामुळे प्रजननक्षमता वाढते. 


खजूर


खजूर आरोग्यासाठी उपयुक्त मानले जातात. खजूरमध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्व असतात. ज्यामुळे शरीराची ताकद वाढते आणि उत्साह देखील कायम राहतो.