बिहार : कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली आहे. मात्र बिहारच्या बक्सर जिल्ह्यात संतापजनक घटना समोर आली आहे. इथल्या रघुनाथपूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्राजवळच्या कचऱ्यात लसी सापडल्याने एकच खळबळ उडाली. या कचऱ्यामध्ये Covishield लसी मिळाल्या आहेत. दरम्यान या घटनेचा व्हिडीयो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर व्हिडीयो व्हायरल झाल्यानंतर रूग्णालयाच्या व्यवस्थेवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. यानंतर तातडीने आरोग्य केंद्राचे व्यवस्थापक विनोद कुमार यांनी घटनास्थळी पोहोचून सर्व लसी जमा केल्या. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला. 


या प्रकरणात निष्काळजीपणात ज्या व्यक्ती दोषी आढळतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असं विनोद कुमार यांनी सांगितलं आहे.


बक्सरचे सिव्हिल सर्जन जितेंद्र नाथ यांनी सांगितलं की, ही बाब निदर्शनास आल्यावरचौकशीसाठी एक समिती स्थापन केली आहे. यामध्ये कोणी निष्काळजीपणा केला असेल तर ते समोर येईलच. तसंच या प्रकरणात दोषी आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल.


ओमायक्रॉनचा नवा स्ट्रेन


कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने जगभरात हाहाकार माजवलाय. अनेक देशांमध्ये कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरिएंट पसरला आहे. तर आता व्हायरसच्या आणखी एका व्हेरिएंटचा धोका निर्माण झाला आहे. या व्हेरिएंटला BA-2 असं नाव देण्यात आलं आहे. चिंतेची बाब म्हणजे टेस्टिंग कीटमध्ये या व्हेरिएंटचं निदान होत नाही. म्हणूनच याला 'स्टेल्थ' म्हणजेच हिडन व्हर्जन म्हटलं जातंय.


आतापर्यंत, या व्हेरिएंटची प्रकरणं यूके, ऑस्ट्रेलिया आणि डेन्मार्कमध्ये नोंदवली गेलीयेत. हा प्रकार ओमायक्रॉन सारखा वेगाने पसरत असल्याची माहिती आहे. अशा परिस्थितीत या व्हेरिएंटची लागण झाल्याचं समजत नसल्याने संसर्ग रोखणं हे मोठं आव्हान आहे.