मुंबई : गर्भधारणेदरम्यान चालणं हा सर्वात सुरक्षित व्यायाम मानला जातो. गर्भवती महिला त्यांच्या प्रसूतीच्या तारखेपर्यंत नियमितपणे चालू शकतात. मात्र अनेकदा महिलांच्या मनात प्रश्न येतो की, गर्भावस्थेच्या काळात व्यायाम करावा का? 


प्रेग्नेंसीमध्ये व्यायाम करणं किती सुरक्षित?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तज्ञांच्या मते, जर तुम्ही निरोगी असाल आणि तुमच्या गरोदरपणात कोणतीही समस्या नसेल, तर तुम्ही व्यायाम सुरू करू शकता. हे केवळ प्रसूतीच्या वेळी तुमचे वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करेल असं नाही तर नियमितपणे व्यायाम केल्याने अकाली प्रसूती आणि गर्भपात होण्याचा धोका देखील कमी होऊ शकतो.


दरम्यान कोणतीही व्यायाम पद्धत सुरू करण्यापूर्वी तज्ज्ञाचा सल्ला महिलांनी अवश्य घ्यावा. जर तज्ज्ञांनी तुम्हाला असे व्यायाम करण्याची परवानगी दिल्यास, तुम्ही व्यायाम करू शकता. हृदयविकार, दमा आणि मधुमेहाने त्रस्त गर्भवती महिलांना व्यायाम न करण्याचा सल्ला दिला जातो.


गर्भधारणेदरम्यान नियमित व्यायामाचे फायदे


  • कंबरदुखीपासून आराम

  • बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम

  • गर्भधारणेदरम्यान अतिरिक्त वजन वाढण्यास प्रतिबंध होतो

  • रक्त प्रवाह सुधारतो

  • प्रसूतीनंतरही वजन कमी होण्यास मदत होते