कोरोनाचा साइड इफेक्ट; व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टवर झाला `असा` परिणाम
एका 72 वर्षीय व्यक्तीला कोरोनाच्या भयंकर आणि अत्यंत दुर्मिळ दुष्परिणामाला सामोरं जावं लागलंय.
अमेरिका : संपूर्ण जगभरात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटची रूग्णसंख्या वाढताना दिसतेय. कोरोनामधून बरं झाल्यानंतरही लोकांना त्याच्या अनेक दुष्परिणामांना सामोरं जावं लागतंय. असंच अमेरिकेत राहणाऱ्या एका 72 वर्षीय व्यक्तीला कोरोनाच्या भयंकर आणि अत्यंत दुर्मिळ दुष्परिणामाला सामोरं जावं लागलंय.
यूरोलॉजी केस स्टडीजने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार, कोरोनामधून बरं झाल्यानंतर या व्यक्तीच्या टेस्टिकलच्या वरील त्वचेवर प्र्युरिटिक स्क्रोटल अल्सर आल्याचं दिसून आलं. त्यानंतर त्याच्या प्रायव्हेट पार्टची त्वचा (Scrotum Explodes) फाटली गेली. याचा त्याच्या टेस्टिकलवर वाईट परिणाम झाला.
नोव्हा साउथईस्टर्न युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ अॅलोपथिक मेडिसिन इथल्या मुख्य लेखिका मशुता हसन म्हणाल्या की, कोविड-19 मुळे त्वचेच्या समस्या आणि सूज येण्यासंबंधीचे विकार झाल्याचं अनेक रिपोर्टमधून समोर आलं आहे.
डॉ. मशुता पुढे म्हणाल्या की, या अहवालात आम्हाला कोविड संसर्गानंतर होणारं Pyoderma Gangrenosum आणि त्यानंतर उद्भवणाऱ्या जननेंद्रियाच्या अल्सरची माहिती मिळाली आहे. यामध्ये रूग्णाच्या Testicleची बाहेरची त्वचा संपूर्णपणे खराब झाल्याचं दिसून आलं.
दरम्यान दीर्घकाळ डॉक्टरांनी केलेल्या उपचारानंतर या व्यक्तीच्या Testicleची जखम पूर्णपणे बरी केली. मात्र, यादरम्यान रुग्णाला तीव्र वेदना सहन कराव्या लागल्या होत्या.