मुंबई : मटारचं पिकं हे हिवाळ्यात येतं, तसेच या काळात ते स्वस्त देखील असतं, त्यामुळे थंडीत त्याला जास्त प्रमाणात खाल्ले जाते. मटारमध्ये व्हिटॅमिन 'के' असते, जे शरीरातील कर्करोगाच्या पेशी वाढवण्यासाठी मदत करते. यामध्ये आढळणारे पोषक घटक हाडे मजबूत करतात, परंतु मटार जास्त प्रमाणात खाऊ नका. तज्ज्ञांच्या मते हिरवे वाटाणे जास्त प्रमाणात घेतल्याने शरीरातील व्हिटॅमिन 'के' ची पातळी जास्त वाढते. व्हिटॅमिन 'के' शरीरात जास्त झाल्याने शरीरातील रक्त पातळ होते, ज्यामुळे प्लेटलेटची संख्या कमी होते. त्यामुळे जर तुम्हाला जखम झाली, तर ती भरायला देखील जास्त काळ लागतो. तसेच एखाद्याला पोटाशी संबंधित समस्या असतील तरीही मटार खाल्ल्याने नुकसान होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मटारमध्ये प्रथिने, अमीनो ऍसिड आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. यामध्ये व्हिटॅमिन डी देखील असते जे हाडांसाठी आवश्यक असते, परंतु ते जास्त प्रमाणात खाल्ल्याने कॅल्शियमची पातळी कमी होऊ लागते आणि यूरिक ऍसिड वाढू लागते.


युरिक ऍसिड वाढल्याने सांधेदुखी होऊ शकते. मटार जास्त प्रमाणात खाल्ल्याने हाडे कमजोर होतात. सांधेदुखीच्या समस्येतही हिरवे वाटाणे खाल्ल्याने तुमचे नुकसान होऊ शकते.


मटारचे जास्त सेवन केल्याने पोटदुखी आणि सूज येऊ शकते. यामुळे गॅसची समस्या उद्भवू शकते. मटारमध्ये भरपूर कार्बोहायड्रेट्स असतात. मटार जास्त प्रमाणात खाल्ल्याने ते सहज पचत नाही आणि मटारमध्ये असलेले लेक्टिन पोटात जळजळ वाढवण्याचे काम करते.


मटार जास्त प्रमाणात खाल्ल्याने डायरियाची समस्या देखील उद्भवू शकते. हिरवे वाटाणे खाल्ल्याने शरीरातील चरबी वाढू शकते. हा प्रथिने आणि फायबरचा खूप चांगला स्रोत आहे, परंतु जास्त प्रमाणात मटार खाल्ल्याने तुमचे नुकसान होईल.


मटार जास्त प्रमाणात खाल्ल्याने शरीराला पोषक तत्व मिळत नाहीत. मटारमध्ये असलेले फायटिक ऍसिड आणि लेक्टिन पोषक तत्वांच्या शोषणात व्यत्यय आणतात.


(टीप: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ते अवलंबण्यापूर्वी, नक्कीच वैद्यकीय सल्ला घ्या. 'झी 24तास" याची पुष्टी करत नाही.)