सकाळच्या वेळेस दूध प्यावं की नाही? पाहा Ayurveda काय सांगतं?
मात्र दिवसाची सुरुवात दुध पिऊन करावी का (Drinking milk in morning) असा अनेकांसमोर प्रश्न असतो.
मुंबई : लहान मुलं असो किंवा मोठी व्यक्ती दूध हा आपल्या आहारातील महत्त्वाचा घटक मानला जातो. लहान बाळ जन्माला आल्यापासून त्याचा आहार हा दूधंच असतो. दूध (Milk) हे अतिशय पौष्टिक तसंच आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असतं. काही प्रमाणातील अपवाद वगळता पौष्टिक गुणधर्मांसाठी दूध फायदेशीर मानलं जातं. मात्र दिवसाची सुरुवात दुध पिऊन करावी का (Drinking milk in morning) असा अनेकांसमोर प्रश्न असतो.
आपल्यापैकी बरेचजणं सकाळी सर्वात आधी दूधाचं सेवन करतात. यामुळे खूप ऊर्जा मिळते आणि ते आरोग्यसाठी (Health) लाभदायी असा समज आहे. रिकाम्या पोटी दूध प्यावं का आणि ते पिण्याची योग्य वेळ कोणती? याबद्दल आयुर्वेदात (Ayurveda) काय म्हटलं आहे हे आज आपण जाणून घेऊया.
दिवसाची सुरुवात दुधाने करावी का?
अनेक जणं त्यांच्या दिवसाची सुरुवात दुधाने करतात. लहानपणापासून ही सवय लागते आणि मग ते पुढे तीच सवय कायम राहते. कारण शरीराला रोज सकाळी दूधाचं सेवन करण्याची सवय लागतं. दूध खूप पौष्टिक आणि अनेक गुणधर्मांनी युक्त असल्याने दूधामुळे शरीराला सकाळी पोषण मिळेल असं वाटू शकतं, पण बहुतेक तज्ज्ञांचं त्यावर उलट मत आहे.
आयुर्वेद काय म्हणतं?
आयुर्वेदानुसार, जर तुम्हाला तुमची सकाळ हलक्या गोष्टीच्या सेवनाने सुरू करावीशी वाटत असेल तर दुधाचं सेवन करणं टाळा. रिकाम्या पोटी दूध प्यायल्याने चांगलं नव्हे तर अधिक नुकसान होतं. यामुळे शरीरातील इन्सुलिनची पातळी वाढू शकते. शिवाय चांगल्या त्वचेसाठी ते फायदेशीरही नसतं.
दूध पिण्याची योग्य वेळ कोणती?
आयुर्वेदानुसार दूध पिण्याची उत्तम वेळ म्हणजे संध्याकाळ. दूध पचायला खूप सोपं असतं आणि तुमचं पोट दीर्घकाळ भरलेलं राहतं. असंही मानलं जातं की, सकाळी दूध प्यायल्याने जडपणा येऊ शकतो. तर संध्याकाळी दूधाचं सेवन केल्याने झोप चांगली येतं. शिवाय मज्जातंतूला आराम मिळण्यास मदत होते.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)