Side Fat Reduce : कंबरेच्या दोन्ही बाजूला चरबी वाढलीये? `या` Exercise ने होईल वेट लॉस
आपल्या पोटाच्या मसल्सला कोर मसल्स म्हटलं जातं. यामध्ये जे स्नायू कंबरेच्या दोन्ही बाजूला असतात, त्यांना साईड कोर स्नायू असं म्हटलं जातं.
Side Fat Reduce : वजन वाढीची (Weight gain) समस्या आजकाल अनेकांमध्ये दिसून येते. केवळ पोटावरील चरबी (Belly Fat) नव्हे तर साईड फॅट म्हणजेच कंबरेच्या दोन्ही बाजूला साचलेलं फॅट कमी करणं खूप मोठं आव्हान असतं. कदाचित तुम्हीही या समस्येने त्रस्त असाल तर हे फॅट कमी करण्यासाठी दोन व्यायाम फायदेशीर आहेत. चला तर मग जाणून घेऊया लव हँडलवरील फॅट कसं कमी कराल?
साईड कोर वर्कआउट (Side Core Workout)
आपल्या पोटाच्या मसल्सला कोर मसल्स म्हटलं जातं. यामध्ये जे स्नायू कंबरेच्या दोन्ही बाजूला असतात, त्यांना साईड कोर स्नायू असं म्हटलं जातं. यासाठी व्यायाम या भागावर परिणाम करून तुम्हाला फॅटपासून मुक्ती मिळू शकते.
साईड फॅट कमी करण्यासाठी पहिला व्यायाम
काही प्रमाणात पायांमध्ये खांद्यापेक्षा जास्त जागा ठेऊन उभे रहा.
थोड्या कमी वजनाचा डंबेल उचला आणि दोन्ही हातांनी तो पोटाजवळ धरा.
कंबरेतून खाली वाका आणि उजव्या पायाच्या बोटांच्या दिशेने हे डंबेल न्या.
पुढच्या स्टेपमध्ये डंबेल उचलून डाव्या खांद्यावर न्या.
अशी क्रिया 15 सेटमध्ये करा.
साईड फॅट कमी करण्यासाठी दुसरा व्यायाम
पहिल्या व्यायामाप्रमाणे पायांची स्थिती असू द्या.
मध्यम वजनाचा डंबेल छातीसमोर उचला.
डंबेल उचलून हात पूर्णपणे उघडा.
यावेळी कंबर स्थिर ठेवून डंबेलसकट डोकं आणि खांदे डावीकडे वळवा.
आता डंबेल मध्यभागी आणा आणि उजव्या बाजूला घ्या
अशा स्थितीत काही काळ रहा.
बेली फॅट कसं कमी कराल?
फॅट वाढवण्याऱ्या पदार्थांचं कमी सेवन करा
पुरेशा प्रमाणात पाणी प्या
एक्सरसाईजसोबत शारीरिक हालचाल देखील वाढवा
फायबर आणि प्रोटीनचा आहारात समावेश करा