Relationship tips : नातं म्हंटलं की गोडवा, रुसवा, फुगवा आलाच. प्रत्येक नातं या टप्प्यातून जात असतं. नातं फुलवायला थोडा वेळ द्यावा लागतो. एखाद्या नात्यात विचारांची, प्रेमाची, सकारात्मक भावनेची गुंतवणूक करावी लागते. नात्यात निरोगीपणा टिकवून ठेवायचा असल्यास त्यात काही चूका टाळणे आवश्यक आहे...
कोणत्या चूका टाळल्या पाहिजे या संदर्भात काही सल्ले (Advice) आम्ही देणार आहोत. हे सल्ले तुम्हाला निरोगी नातेसंबंध विकसित करण्यासाठी फायदेशीर ठरतील... (signs of healthy relationship These tips will definitely be beneficial in your life)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1. आदर करणे (respect)
तुम्ही नात्यात असता तेव्हा तुम्हाला समोरील व्यक्तीचा आदर करता आला पहिजे. एकमेकांचा आदर केल्याने तुमच्यातले नातं दिर्घकाळ टिकते. वाद तर प्रत्येक नात्यात असतात पण त्या वादात समोरील व्यक्तीचा अपमान होणार नाही असे शब्द टाळा. अशाने नातं निरोगी राहते.


2. विश्वास ठेवणे (faith)
नात्यात जर विश्वास असेल तर नातं चांगले टिकते. अशी कोणतीही गोष्ट लपवू नका जेणेकरुन समोरील व्यक्तीला तुमच्यावर अविश्वास वाटेल. विश्वास ही नात्यातली सगळ्यात महत्त्वाची दोरी आहे.


3. काळजी घेणे (worry)
समोरील व्यक्तीची काळजी घेणे तितकंच महत्त्वाचे आहे. दिखावा न करता काळजी घ्या. काळजी घेताना समोरील व्यक्तीला ऐकवून नका दाखवू. मी तुझ्यासाठी खूप काही केलं असं न म्हणता... मला तुझी काळजी घ्यायला आवडेल. यामध्ये तुमच्यात असलेली काळजी दिसते.


4. समोरील व्यक्तीचे ऐकणे (Listening to the other person)
एकमेकांशी संवाद साधताना नेहमीच हे लक्षात ठेवा, समोरील व्यक्तीला बोलायला वेळ द्या आणि त्याचे मत न ऐकताच त्या व्यक्तीचे परिक्षण करु नका. अशाने तुम्ही समोरील व्यक्तीच्या मतांना आणि विचारांना महत्त्व देत नाही आहात असा याचा अर्थ होतो. 


आणखी वाचा... Relationship tips: तुम्ही डेटला गेल्यावर या चुका करता का? चुका टाळण्याच्या सिक्रेट टिप्स


5. प्रामाणिक राहणे (Honest)
तुमची प्रामाणिकता कोणीच मागत नाही. एखाद्या नात्यात बराच काळ घालवल्यानंतर आपोआप समोरच्या व्यक्तीला प्रामाणिकता कळू लागते. तर एखादं सत्य लपवण्यासाठी खोटं बोलल्यास तुमची प्रामाणिकता तिथे राहत नाही.


6. मदत करणे (help)
कोणत्याही परिस्थित एकमेकांना मदत करण्याची भावना असली पहिजे. विचारपूस करणे, आलेल्या संकटांवर मात करणे, शेअरींग करणे अशा प्रकारची मदत तुम्ही नात्यात करत असता. 


निरोगी नातेसंबंधात (healthy relationship) एकमेकांचा आदर करणे, विश्वास ठेवणे, काळजी घेणे, समोरील व्यक्तीचे ऐकणे, प्रामाणिक राहणे, मदत करणे हे सगळे महत्त्वाचे मुद्दे आहेत. नातेसंबंधात तजेलदारपणा राहावा यासाठी हे मुद्दे महत्त्वाचे आहेत. त्यामुळे नातं फुलतं, बहरतं, आणि दिर्घकाळ टवटवीत राहतं.


(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)


आणखी वाचा... Lifestyle : तुम्ही स्वत:वर वेळ खर्च करता का? नसेल करत तर करुन पाहा...