Signs of Kidney Failure : किडनी खराब झाली असेल तर तुमचं शरीर देईल `हे` संकेत!
आम्ही तुम्हाला असा अशा काही लक्षणांबद्दल आणि संकेतांबद्दल (Symptoms of Kidney Disease) सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला लगेच समजू शकणार आहात की, तुमची किडनी योग्यरित्या काम करत नाही.
Early Warning Signs of Kidney Failure : किडनी (Kidney) आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा अवयव आहे. किडनी तुमच्या शरीरातील रक्ताला साफ (clean blood) ठेऊन टॉक्सिन पदार्थ बाहेर टाकण्याचं काम करते. मात्र जेव्हा तुमची किडनी योग्य पद्धतीने (Healthy Kidney) काम करत नाही, त्यावेळी तुम्हाला अनेक लक्षणं दिसून येतात. अशामध्ये आम्ही तुम्हाला असा अशा काही लक्षणांबद्दल आणि संकेतांबद्दल (Symptoms of Kidney Disease) सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला लगेच समजू शकणार आहात की, तुमची किडनी योग्यरित्या काम करत नाही. जाणून घेऊया या संकेतांबद्दल
जास्त थकवा जाणवणं
जर तुम्हाला छोटी छोटी काम करून सतत थकवा जाणवत असेल आणि तुम्ही गोष्टींवर लक्ष केंद्रित करू शकत नसाल तर हा वाईट संकेत आहे. जेव्हा तुमची किडनी योग्यरित्या काम करत नाही, तेव्हा रक्तामध्ये टॉक्सिन आणि घाण साचू लागते. ज्यामुळे तुम्हाला थकवा जाणवू शकतो.
त्वचा सुकणं
आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, किडनी खूप महत्त्वपूर्ण कामं करते. तुमच्या शरीरातून वेस्ट मटेरियल आणि अधिक प्रमाणात द्रव बाहेर टाकण्यास मदत करत. याशिवाय किडनी लाल रक्तपेशी तयार करण्यास मदत करतात तसंच, हाडे मजबूत ठेवतात आणि रक्तातील पोषक घटकांचं योगय प्रमाण राखतात. यामुळे त्वचेमध्ये कोरडेपणा येऊन खाज येण्याची शक्यता असते. हे किडनी निकामी होण्याचंही लक्षण असू शकतं.
लघवीतून रक्त येणं
हेल्दी किडनी सामान्यत: शरीरातील रक्तपेशी टिकवून ठेवण्यास मदत करते. यासाठी लघवी तयार होण्याच्या प्रक्रियेसाठी रक्तातील टाकाऊ पदार्थ फिल्टर करतात. मात्र ज्यावेळी किडनीचे हेच फिल्टर खराब होतात त्यावेळी या रक्तपेशी लघवीतून लीक होऊ लागतात.
लघवीतून फेस येणं
अनेकदा जास्त प्रेशरनंतर तुम्ही लघवीला गेलात की, काही प्रमाणात फेस येताना दिसतो. मात्र काही सेकंदांनंतर हा फेस निघून जातो. मात्र जर तुमच्या लघलवीतून जास्त प्रमाणात फेस निघत असेल तर प्रोटीमची कमतरता असल्याचं हे लक्षण आहे.
पायांमध्ये सूज येणं
ज्यावेळी किडनी योह्य पद्धतीने सोडियम शरीराबाहेर काढू शकत नाही, तेव्हा तुमच्या शरीरात द्रव पदार्थाची मात्रा जास्त असते. ज्यामुळे हात, पाय, घोटे किंवा चेहऱ्यावर सूज येण्याची समस्या निर्माण होऊ शकते.