मुंबई : दिवसेंदिवस उन्हाळाच अधिकच तीव्र होत चाललाय. कडक उन्हामुळे त्वचाही काळवंडते. जेव्हा सूर्याची किरणे थेट त्वचेवर पडतात तेव्हा त्वचा काळवडंते. कडक उन्हामुळे गरज असेलच तर दुपारचे घराबाहेर पडण्याचा सल्ला दिला जातोय. बाजारात टॅनिंगवर उपाय म्हणून अनेक क्रीम्स आहेत. सन टॅनिंग रिमूव्हल क्रीम्स आणि लोशन्स मिळतायत. मात्र या उपायांनी तितकासा फायदा होत नाही. तुम्ही घरातीलच उपायांनी या समस्येवर समाधान मिळवू शकता. काही घरगुती पॅक्सनी तुम्ही चेहऱ्यावरील काळेपणा हटवू शकता.


या पॅक्सनी हटवा सन टॅनिंग


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१. संत्र्याचा फेसपॅक


संत्रे अथवा लिंबाच्या सालीची पावडर
१ टी स्पून कच्चे दूध
कृती - एका वाटीत लिंबू अथवा संत्र्याच्या सालीची पावडर घ्या. त्यात कच्चे दूध घ्या. हे मिश्रण घट्ट असू द्या. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. १०-१५ मिनिटांनी चेहरा धुवा. आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा प्रयोग करा.


२. साखर, ग्लिसरीन आणि लिंबाचा फेसपॅक
१ चमचा साखर
अर्धा चमचा ग्लिसरीन
१ चमचा लिंबाचा रस


कृती - एका वाटीत लिंबाचा रस टाकून त्यात साखर आणि ग्लिसरीन मिसळा. हा पॅक स्क्रबप्रमाणे चेहऱ्यावर लावून मसाज करा. चेहऱ्यावर कमीत कमी ३-४ मिनिटे स्क्रबिंग करा. त्यानंतर चेहरा पाण्याने धुवा.


३. केळ्याचा फेसपॅक


१ चमचा दूध
१ चमचा लिंबाचा रस
अर्धे केळे
कृती - केळ्याला कुस्करुन घ्या. त्यात दूध आणि लिंबाचा रस घालून चांगले एकजीव करा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. १५ मिनिटांनी चेहरा धुवा.


४. मुलतानी मातीचा फेसपॅक


मुलतानी माती
टोमॅटोचा रस
चंदन पावडर
गुलाबपाणी
कृती - हे सर्व मिश्रण मिक्स करुन घ्या आणि पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावून १५ मिनिटांनी चेहरा धुवा. यात टोमॅटोच्या रसाऐवजी नारळाचे पाणीही वापरु शकता.