मुंबई : चांगल्या आरोग्यासाठी पुरेशी झोप घेणे खूप महत्त्वाचे आहे. आरोग्यतज्ज्ञांच्या मते रोज 7 ते 8 तास झोप न घेतल्यास अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कमी झोपेमुळे होणाऱ्या आरोग्याच्या हानीबद्दल सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोगप्रतिकारक शक्ती
पुरेशी झोप न मिळाल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, ज्यामुळे तुम्ही खूप आजारी पडू शकता. कमकुवत प्रतिकारशक्तीमुळे रोगांशी लढण्याची क्षमता कमकुवत होते. त्यामुळे दिवसभरात किमान 7 ते 8 तास झोप घेण्याचा प्रयत्न करा.


हृदयाचे नुकसान करते
जर तुम्ही फक्त 5 ते 6 तासांची झोप घेतली तर ते तुमच्या हृदयाला हानी पोहोचवू शकते. यामुळे तुम्हाला हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त असते.


कर्करोगाचा धोका 
कमी झोपेमुळे कर्करोगासारखे गंभीर आजारही होऊ शकतात. विशेषत: जे रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करतात त्यांना प्रोस्टेट कॅन्सर आणि कोलोरेक्टल कॅन्सर होण्याचा धोका जास्त असतो.


मानसिक आरोग्यावर परिणाम
पुरेशी झोप न मिळाल्याने तुमच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. यामुळे तुमचा तणाव आणि नैराश्याची पातळी खूप वाढते. यासोबतच विचार करण्याच्या आणि समजून घेण्याच्या क्षमतेवरही वाईट परिणाम होतो.


वजन वाढण्याची शक्यता
झोपेच्या कमतरतेमुळेही काही लोकांचे वजन वाढण्याची शक्यता असते. संशोधनात हे सिद्ध झाले आहे की जे लोक पुरेशी झोप घेत नाहीत, त्यांचे वजन खूप वेगाने वाढते.


मधुमेहाचा धोका
पुरेशी झोप न मिळाल्याने मधुमेहाचा धोकाही असतो. विशेषत: जर तुम्ही दररोज 7 ते 8 तास झोप घेत नसाल तर त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी खूप वाढू शकते.


हे झाले कमी झोप घेण्याचे दुष्परीणाम आता तुम्हाला रोज चांगली झोप येण्यासाठी काय केले पाहिजे. हे देखील सांगणार आहोत. 


'हे' पर्याय करून बघा


  • नियमित व्यायाम करा.

  • निरोगी आहार निवडा.

  • झोपण्यापूर्वी गॅझेट वापरू नका.

  • झोपेचे संगीत ऐका.


(Disclaimer:  येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची पुष्टी करत नाही.)